मे ८
Appearance
मे ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२८ वा किंवा लीप वर्षात १२९ वा दिवस असतो.
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५४१ - स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले.
अठरावे शतक
[संपादन]- १७९४ - फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ ऑंत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-पॅलो आल्टोची लढाई.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेने रिचमंड, व्हर्जिनिया आपली राजधानी असल्याचे जाहीर केले.
- १८८६ - डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
- १८९६ - इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने वॉरविकशायर विरुद्ध ८८७ धावांची विक्रमी खेळी केली.
- १८९९ - रँड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी.
विसावे शतक
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९०२ - मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पिएर हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.
- १९१२ - पॅरामाऊंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
- १९३२- पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
- १९३३ - महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध-युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त.
- १९४५ - सेटीफची कत्तल - फ्रान्सच्या सैन्याने अल्जीरियात हजारो नागरिकांना ठार मारले.
- १९६२- पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे रवींद्र भारती विश्वविद्यालयाची स्थापना.
- १९७३ - अमेरिकेच्या दक्षिण डाकोटा राज्यातील वुन्डेड नी येथील मूळ अमेरिकन व्यक्तिंचा ७१ दिवस चाललेला वेढा बिनशर्त शरणागती नंतर उठला.
- १९७४ - कॅनडाचे सरकार अल्पमतात येउन कोसळले.
- १९७४ - रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
- १९७८ - रेनहोल्ड मेस्नर व त्याचा सहकारी ऑक्सिजनच्या नळकांड्याविना एव्हरेस्टवर पोहोचले.
- १९८४ - सोवियेत संघाने लॉस एंजेल्समधील तेविसावे ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- १९८४ - डेनिस लॉर्टीने कॅनडातील क्वेबेक प्रांताच्या विधानसभेत गोळ्या चालवल्या. ३ ठार. १३ जखमी.
- १९९७ - चायना सदर्न एरलाइन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान शेंझेन विमानतळावर उतरत असताना कोसळले. ३५ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.
- २००७ - उत्तर आयर्लंडमध्ये सत्तांतर.
जन्म
[संपादन]- १७५३ - मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
- १८२८ - ज्यॉॅं हेन्री ड्युनांट, रेड क्रॉसचा संस्थापक.
- १८८४ - हॅरी ट्रुमन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर
- १९१६ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९१६- भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता
- १९२५ - अली हसन म्विन्यी, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२९- गायिका गिरिजा देवी
- १९३८ - जावेद बर्की, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७० - मायकेल बेव्हन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - रियाझ पूनावाला, संयुक्त अरब अमिरातीचा क्रिकेट खेळाडू.
- १९८९: भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल
मृत्यू
[संपादन]- ५३५ - पोप जॉन दुसरा.
- १२७८ - दुआनझॉॅंग, चीनी सम्राट.
- १३१९ - हाकोन पाचवा, नॉर्वेचा राजा.
- १७७३ - अली बे अल-कबीर, इजिप्तचा सुलतान.
- १७९४ - आंत्वान लेव्हॉइझिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८१९ - कामेहामेहा, हवाईचा राजा.
- १८९९ - वासुदेव चाफेकर, भारतीय क्रांतिकारक.
- १९२० : पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे
- १९५२ : फॉक्स थियेटरचे संस्थापक विल्यम फॉक्स
- १९७२ : भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पांडुरंग वामन काणे
- १९८१ : डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
- १९८२ -४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे
- १९८४ : रीडर्स डायजेस्टचे सहसंस्थापक लीला बेल वालेस
- १९९५ : पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी प्रेम भाटिया
- १९९५ : देवदेवतांची आणि संतांची चित्रे चितारण्यासाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार जि.भी. दीक्षित
- १९९९ : कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ
- २००३ : संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे
- २००३ - ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे
- २०१३ : धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर
- २०१४ : जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक रेडक्रॉस दिन.
- युरोप विजय दिन.
- जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन
- रेड क्रेसेंट दिन
- वर्धापनदिन : रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)