मे ११
Appearance
मे ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३१ वा किंवा लीप वर्षात १३२ वा दिवस असतो.
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
11 may भारतीय राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]- ३०३ - बायझेन्टाईन साम्राज्याची राजधानी बायझेन्टियमचे नोव्हा रोमा (नवीन रोम) असे नामकरण. कॉन्स्टेन्टिनोपल हेच नाव जास्त प्रचलित.
चौदावे शतक
[संपादन]- १३१० - नाइट्स ऑफ टेम्पलार या संघटनेच्या ५४ सदस्यांना फ्रांसमध्ये अधर्मी ठरवून जिवंत जाळण्यात आले.
सोळावे शतक
- १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडीज बेटांकडे निघाला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१२ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हालची हाउस ऑफ कॉमन्समध्ये हत्या.
- १८१८ - चार्ल्स चौदावा स्वीडनच्या राजेपदी.
- १८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम - स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
- १८५८ - मिनेसोटा अमेरिकेचे ३२वे राज्य झाले.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेची युद्धनौका सी.एस.एस. व्हर्जिनीया बुडाली.
- १८६७ - लक्झेम्बर्गला स्वातंत्र्य.
- १९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १८८८ - ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
विसावे शतक
[संपादन]- १९०७ - कॅलिफोर्नियातील लॉम्पॉक गावाजवळ गाडी रुळावरून घसरली. ३२ ठार.
- १९१० - अमेरिकन काँग्रेसने ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानची रचना केली.
- १९२७ - चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
- १९३४ - अमेरिकेच्या मध्य भागात भयानक वादळ सुरू झाले. शेतीलायक जमीनींवरून अतीप्रचंड प्रमाणात माती उडुन गेली. याचे पर्यवसान पुढील काही वर्षांतील दुष्काळात झाले..
- १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने अल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु येथील जपानी सैन्यावर हल्ला केला.
- १९४९ - सयामचे थायलंड असे नामकरण.
- १९४९ - इस्रायेलला संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- १९५३ - अमेरिकेच्या वेको शहरात एफ.५ टोर्नेडो. ११४ ठार.
- १९६० - इस्रायेलच्या गुप्त पोलिसी संस्था मोसादने नाझी अधिकारी ऍडोल्फ आइकमनला आर्जेन्टिनाच्या बोयनोस एर्स शहरात पकडले.
- १९७० - अमेरिकेच्या लबक शहरात एफ.५ टोर्नेडो. २६ ठार.
- १९८५ - इंग्लंडच्या ब्रॅडफर्ड शहरात फुटबॉलचा सामना सुरू असताना आग. ५६ ठार.
- १९८७ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात सर्वप्रथम हृदय व फुप्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
- १९८७ - गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १९९२ - फिलिपाईन्समध्ये निवडणुका. जनरल फिदेल रामोस विजयी.
- १९९६ - व्हॅल्युजेट फ्लाइट ५९२ हे डी.सी.९ प्रकारचे विमान फ्लोरिडातील मायामी जवळ कोसळले. ११० ठार.
- १९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
- १९९७ - बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह आय.बी.एम.च्या डीप ब्ल्यु या संगणकाकडून पराभूत.
- १९९८ - भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
- १९९८ - फिलिपाईन्समध्ये निवडणुका. जोसेफ एस्ट्राडा विजयी.
- १९९९ - जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीचा १,०००वा सामना खेळली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार रेवाच्या विक्रीला सुरुवात झाली.
- २००२ - स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात प्लास्टिकच्या कारखान्यास आग. ९ ठार.
जन्म
[संपादन]- १७२० - कार्ल फ्रेडरिक हियेरोनिमस फ्राइहेर फोन मंचहाउसेन, जर्मन सेनाधिकारी व भटक्या.
- १८९५ - जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९०४ - साल्वादोर दाली, स्पॅनिश चित्रकार.
- १९१४ - ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
- १९३० - एड्स्टार डाइक्सट्रा, डच संगणक तज्ञ.
- १९१८ - रिचर्ड फाइनमन, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
- १९४६ - रॉबर्ट जार्विक, कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट.
- १९५० - सदाशिव अमरापूरकर, मराठी आणि हिंदी नाट्य आणि चित्रपट अभिनेता.
- १९७२ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ९१२ - लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट.
- १३०४ - महमुद गझन, पर्शियाचा राजा.
- १७७८ - विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८१२ - स्पेन्सर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७१ - जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १९५५ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - बॉब मार्ली, जमैकाचा संगीतकार.
- १९९३ - शाहू मोडक, अभिनेते.
- २००१ - डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
- २००४ - कृष्णदेव मुळगुंद, मराठी चित्रकार व नृत्यदिग्दर्शक.
- २००९ - सरदारीलाल माथादास नंदा, भारतीय दर्यासारंग.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- तंत्रज्ञान दिन - भारत.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)