व्लादिमिर प्रेलॉग
Appearance
व्लादिमिर प्रेलॉग (Vladimir Prelog; २३ जुलै १९०६, सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी - ७ जानेवारी १९९८, झ्युरिक, स्वित्झर्लंड) हा एक क्रोएशियन-स्विस रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९७५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून (जॉन कॉर्नफर्थ सोबत) मिळाले होते.
सारायेव्हो येथे जन्मलेला प्रेलॉग त्याच्या आयुष्यखंडात प्रामुख्याने प्राग, झाग्रेब व झ्युरिक ह्या शहरांमध्ये राहिला.