लंडन काउंटी
Appearance
लंडन काउंटी तथा काउंटी ऑफ लंडन ही इंग्लंडच्या लंडन शहराजवळच्या प्रदेशातील काउंटी होती. साधारणपणे सध्याच्या इनर लंडन म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रदेशातील ही काउंटी १८८९ आणि १९६५ दरम्यान अस्तित्त्वात होती.. लंडन काउंटी काउन्सिल येथील प्रशासन चालवित असे. काउंटीच्या सीमा वाढविण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला. १९६१मध्ये या काउंटीचा विस्तार ३०३.१२ किमी२ (७४,९०३ एकर) इतका होता.
काउंटीच्या अस्तित्त्वादरम्यान येथील लोकसंख्या हळूहळू उपनगरांमध्ये स्थलांतरित झाली. १९६५मध्ये लंडन गव्हर्नमेंट अॅक्ट १९६३ द्वारे या काउंटीचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी लंडन काउंटी ग्रेटर लंडनमध्ये विलीन झाले.