ऑलिंपिक स्टेडियम (म्युनिक)
Appearance
(ऑलिंपिक मैदान (म्युनिक) या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपियास्टेडियोन | |
---|---|
स्थान | म्युन्शेन, जर्मनी |
उद्घाटन | २६ मे १९७२ |
आसन क्षमता | ६९,२५० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
एफ.से. बायर्न म्युन्शन (१९७२ - २००५) टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन (१९७२ - २००५) १९७२ उन्हाळी ऑलिंपिक |
ऑलिंपियास्टेडियोन (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९७२ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९७२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. १९७४ फिफा विश्वचषक व युएफा यूरो १९८८ स्पर्धांमधील अनेक महत्त्वाचे सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चॅंपियन्स लीगमधील १९७९, १९९३ व १९९७ सालांमधील अंतिम फेरीचे सामने सामने येथे खेळवण्यात आले होते.
२००६ साली अलायंझ अरेना उघडण्यापूर्वी एफ.से. बायर्न म्युन्शन व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन ह्या दोन फुटबॉल क्लबांचे ऑलिंपियास्टेडियोन हे यजमान मैदान होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-11-02 at the Wayback Machine.