Jump to content

घड्याळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इस.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली.

लंडनच्या किंग्स क्रॉस रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील घड्याळ
मेलबर्न येथील विज्ञान प्रदर्शानात असलेले कायम सूर्यप्रकाश व सावली यावर आधारीत घड्याळ
चीनी बनावटीच्या उदबत्ती घड्याळाची प्रतिकृती
११व्या शतकातील कैफेंग, चीनमध्ये सु साँगने बनविलेल्या घड्याळाची छोटी प्रतिकृती. हे घड्याळ पाण्यावर चालत असे
बाराव्या शतकातील अल-जझारीने तयार केलेले घड्याळ
अल-जझारीने लिहिलेल्या चतुर यंत्रांच्या माहितीचे पुस्तक या पुस्तकातील हत्तीघड्याळ