Jump to content

अलास्का एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा ०९:०२, १६ डिसेंबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
अलास्का एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
AS
आय.सी.ए.ओ.
ASA
कॉलसाईन
अलास्का
स्थापना इ.स. १९३२ (मॅकगी एरवेझ नावाने)[]
हब
फ्रिक्वेंट फ्लायर मायलेज प्लान
विमान संख्या १४७
पालक कंपनी अलास्का एर ग्रूप
मुख्यालय सिॲटल
प्रमुख व्यक्ती ब्रॅड टिल्डन, मुख्याधिकारी[]
संकेतस्थळ अलास्काएर.कॉम

अलास्का एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. वॉशिंग्टन राज्याच्या सिॲटल शहरात मुख्यालय असलेली ही कंपनी अलास्का एर ग्रुपची उपकंपनी आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील १००पेक्षा अधिक शहरांना सेवा पुरवणारी ही विमान कंपनी २००४ सालापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.[]

इतिहास

[संपादन]

अलास्का एरलाइन्स विमान कंपनीची स्थापना १९३२मध्ये मॅकगी एरवेझ या नावाने झाली त्यावेळी ही कंपनी मुख्यत्वे ॲंकरेजपासून विमानसेवा पुरवायची.

कार्यप्रणाली

[संपादन]

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ या कंपनीचे मुख्य ठाणे आहे. याशिवाय लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्टलॅंड आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ॲंकोरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुय्यम दर्जाचे तळआहेत.[] या कंपनीचे अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी अलास्का राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्त्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून तिच्या तळांपर्यंत सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात अन्य कंपन्यांपेक्षा जास्त वाहतूक करते.[]

नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या वैमानिकांपैकी १,५५० वैमानिकांचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाइट अटेंडंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.

मे २००५ पासून कंपनीचे प्रवासी सामान हाताळायचे काम मेंझिस एविएशनला देण्यात आलेले आहे. यामुळे कंपनीची अंदाजे १ कोटी ३० लाख अमेरिकन डॉलरची बचत झाली.[]

अलास्का एरलाइन्स अमेरिकेच्या काही भागात मालवाहतूक सेवा पुरवते. सर्वात लांबचे उड्डाण अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरील शहरांतून आहे. अलास्का एरलाइन्स मालवाहतूक प्रामुख्याने अलास्का आणि त्याचे वायव्य अमेरिकेतील राज्यांवर आहे. अलास्काच्या दक्षिणेला प्रामुख्याने ताज्या अलास्कन समुद्री खाद्द्याची वाहतूक तर उत्तरेला प्रामुख्याने टपालाची वाहतूक होते.

अलास्काचे हवाई जाळे अमेरिका, कॅनडा, कोस्टा रिका आणि मेक्सिकोच्या ९२ पेक्षा जास्त शहरात पसरलेले आहे. काही राज्यांमध्ये नाममात्र सेवा चालविली जाते, ज्यामध्ये ॲंकोरेज, अँडाक, बॅरो, कॉर्डोव, फेरबँक्स, जूनो, केचिकम, कोडियाक, कोटझेबू, किंग सामन, नोम, प्रुडहो बे आणि सिट्का यांचा समावेश ज्यापैकी काही ठिकाणी तर रस्तामार्गाने जाता येत नाही. १९९१ मध्ये सोवियेत युनियनच्या विभाजनानंतर कंपनीने रशियाच्या पूर्व भागात सेवा सुरू केली.[] परंतु १९९८ च्या रशियन वित्तीय संकटानंतर त्यांनी सेवा बंद केली.

ऐतिहासिकरित्या अलास्का अमेरिकेच्या पश्चिमी किनारपट्टीवरील तसेच अलास्कापर्यंत आणि अलास्काअंतर्गत सेवा पुरविणारी सर्वात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. प्रथमवर्गात मध्ये प्रवाशांना मोफत जेवण किंवा हलका नाश्ता देण्यात येतो. २००६ मध्ये कंपनीने नॉर्थर्न बाइट्स नावाची विमानत खाद्यपदार्थ विकत देण्याची योजना सुरू केली. ही सुविधा अडीच तासांच्या वर प्रवास असलेल्या जवळपास सगळ्याच विमानांमध्ये आहे.[]

अलास्का एरलाइनन्ला वर्ल्ड एरलाइन एन्टरटेनमेंट असोशिएशन द्वारा प्रवाशांना विमानात ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारी पहिली कंपनी असल्याचे प्रमाणित करण्यात आले.[१०] अलास्काने ऑक्टोबर २००३मध्ये हार्ड ड्राईव असलेला, मागणीप्रमाणे ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारा पोर्टेबल उपकरण बसविले

अलास्का एरलाईन्सला मार्च २०१४ मध्ये एरलाइन आय.एफ.इ. सर्विस ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.[११]

२००९मध्ये अलास्का एरलाईन्सने विमानात वाय-फाय सुविधेची चाचणी सुरू केली.[१२] ऑक्टोबर २०१० पासून हळूहळू सगळ्याच विमानात ही सुविधा देण्यात आली.

भागीदारी

[संपादन]

अलास्का एरलाइनन् ३ सगळ्यात मोठ्या विमान संघटनांपैकी कुठल्याही संघटनेची सदस्य नाही आहे. परंतु तिचे वन वर्ल्ड अमेरिकन एरलाइन्स, ब्रिटिश एरवेझ आणि लॅटॅम, आणि स्कायटीमच्या काही सदस्य कंपन्या एर फ्रांस, के.एल.एम. आणि कोरियन एर सोबत कर्रा आहेत. डेल्टा एरलाइन्सशी असलेला करार १९ डिसेंबर २०१७ रोजी संपेल. डेल्टा आता सिॲटल-टॅकोमा मध्ये अलास्काची सगळ्यात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी आहे. अलास्का एर ग्रुपचे समभाग २०११ पासून डाऊ-जोन्स ट्रान्सपोर्टेशन ॲव्हरेजमध्ये शामील आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Norwood, Tom; Wegg, John (2002). North American Airlines Handbook (3rd ed.). Sandpoint, ID. ISBN 0-9653993-8-9. 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-25 रोजी पाहिले.
  2. ^ Alaska Airline Fact Sheet
  3. ^ Associates Press;Thu, February 16, 2012 (February 16, 2012). "Alaska Air CEO retiring; insider to replace him - Yahoo! News". May 17, 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "J.D. Power Study Ranks Alaska Airlines Highest in Traditional Carrier Satisfaction for Seventh Straight Year". May 14, 2014.
  5. ^ "Alaska Airlines flight schedule". 2016-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-30 रोजी पाहिले.
  6. ^ "Alaska Airlines company facts".
  7. ^ "Alaska Airlines outsources 472 baggage-handling jobs".
  8. ^ "Alaska Airlines Opens Russia's 'Wild East'".
  9. ^ "Inflight food and drinks".
  10. ^ "Historical Firsts". 2008-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-30 रोजी पाहिले.
  11. ^ "Awards - Alaska Airlines".
  12. ^ "Alaska Airlines Trials Satellite-Based Inflight Wireless Internet Service". 2016-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-30 रोजी पाहिले.