२००८ फॉर्म्युला वन हंगाम
२००८ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: २००७ | पुढील हंगाम: २००९ |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |
२००८चा फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन अजिंक्यपदाचा ५९वा हंगाम होता. या हंगामाची सुरुवात मार्च १६ रोजी झाली व नोव्हेंबर २ला शेवट झाली. या हंगामात एकुन १८ शर्यती घेण्यात आल्या.
लुइस हॅमिल्टनला २००८ चे चालक अजिंक्यपद ऐका गुणावरून मिळाले. त्याने शेवटच्या शर्यतीत टिमो ग्लोकला शेवटच्या कोपऱ्यात गाठुन मागे टाकले. त्यामुळे त्या शर्यतीत त्याला ५वे स्थान मिळाले, व फिलिपे मास्साचे ५वे स्थान गेले. २००७वा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकणारा किमी रायकोन्नेन, २००८ फॉर्म्युला वन अजिंक्यपदी तिसऱ्या स्थानात आला. त्याने या हंगामात दोन शर्यती जिंकल्या होत्या. स्कुदेरिआ फेरारीला २००८ चे कारनिर्माता अजिंक्यपद मिळाले.[१]लुइस हॅमिल्टनहा सर्वात लहान वयात अजिंक्यपद जिंकणारा या पदवीच्या मानकरी झाला व डेमन हिल नंतर ग्रेट ब्रिटनसाठी अजिंक्यपद जिंकणारा तो एकमेव चालक ठरला. डेमन हिल ने ग्रेट ब्रिटनसाठी १९९६ फॉर्म्युला वन हंगामात अजिंक्यपद मिळावले होते.[२]
एकुन अकरा कारनिर्मात्या संघांनी या अजिंक्यपदासाठी भाग घेतला. सुपर आगुरी एफ१ संघाने मे ६ रोजी या हंगामातुन माघार घेतली, त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांना फक्त ४ शर्यती पूर्ण करून माघार घ्यावी लागली. २००८चा फॉर्म्युला वन हंगामात काही नवीन कायदे सुद्धा अमलात आणण्यात आले, जसे ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल व इंजिन ब्रेकींग रिड्कशन या इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर प्रतिबंध. २००१चा फॉर्म्युला वन हंगामात त्यांच्यावरील प्रतिबंध हटवण्यात आले होते.
२००८ फॉर्म्युला वन हंगामात दोन नवीन सर्किटांचा समावेश झाला, त्यात वेलेंशिया स्ट्रीट सर्किट व मरीना बे स्ट्रीट सर्किटचा समावेश आहे. वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे युरोपियन ग्रांप्री आयोजीत झाली व मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे सिंगापूर ग्रांप्री आयोजीत करण्यात आली. सिंगापूर ग्रांप्री ही फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती. होंडा रेसिंग एफ१ कार्निर्मात्या संघाने त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली. नंतर रॉस ब्रानने हा संघ विकत घेतला, व नवीन संघाचे नाव ब्रॉन जीपी म्हणून ठेवले. ब्रॉन जीपी कार्निर्माता संघने त्यांच्या गाड्यांसाठी मर्सिडिज-बेंझ इंजिनांचा वापर केला. २००८ फॉर्म्युला वन हंगाम हा शेवटचा हंगाम होता जेथे खाचे असलेले टायर वापरले गेले. खाचे असलेले टायर वापरण्याच्या प्रथेची सुरुवात १९९८ फॉर्म्युला वन हंगामापासुन झाली होती. २००९ फॉर्म्युला वन हंगामापासुन गुळगुळीत टायर वापरण्याच्या प्रथेची सुरुवात झाली.
फॉर्म्युला वनच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की सर्व संघानी त्यांच्या दोघ्या चालकांचा वापर पूर्ण हंगामात केला, व पहील्यांदा ट्रॅक्शन कंट्रोलच्या बिना गाड्या चालवण्यात आल्या होत्या.
संघ आणि चालक
[संपादन]२००८ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ७ संघांनी एफ.ओ.एम. बरोबरच्या करारावरून भाग घेतला व अजून ४ संघांनी जी.पी.एम.ए बरोबर २००६ स्पॅनिश ग्रांप्रीच्या वेळी एका कबुलीपत्रीकेवर सही केली होती म्हणून त्यांनी ही २००८ हंगामात सहभाग घेतला. सर्व संघांना २ जागा देण्याता आल्या. २००८ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००८ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[३]
संघ | कारनिर्माता | चेसिस | इंजिन† | टायर | चालक क्र. | रेस चालक | शर्यत क्र. | चालक क्र | परीक्षण चालक |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो | स्कुदेरिआ फेरारी | फेरारी एफ.२००८[४] | फेरारी ०५६ | ब | १ | किमी रायकोन्नेन[५] | सर्व | ३१ | लुका बाडोर[६] मार्क जीनी[६] मिखाएल शुमाखर[७] |
२ | फिलिपे मास्सा[८] | सर्व | |||||||
बी.एम.डब्ल्यू. सौबर | बी.एम.डब्ल्यू. सौबर | बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८[९] | बी.एम.डब्ल्यू. पी.८६/८ | ब | ३ | निक हाइडफेल्ड[१०] | सर्व | ३२ | ख्रिस्टियन क्लेन[११] मार्को अस्मेर[११] |
४ | रोबेर्ट कुबिचा[१०] | सर्व | |||||||
आय.एन.जी रेनोल्ट एफ१ | रेनोल्ट एफ१ | रेनोल्ट आर.२८[१२] | रेनोल्ट आर.एस.२७ | ब | ५ | फर्नांदो अलोन्सो[१३] | सर्व | ३३ | लुकास डी ग्रासी[१४] रोमन ग्रोस्जीन[१५] सकोन यामामोटो[१६] |
६ | नेल्सन आंगेलो पिके | सर्व | |||||||
ए.टी.& टी. विलियम्स एफ१ | विलियम्स एफ१ | विलियम्स एफ.डब्ल्यू.३०[१७] | टोयोटा आर.व्ही.एक्स.०८[१८] | ब | ७ | निको रॉसबर्ग[१९] | सर्व | ३४ | निको हल्केनबर्ग[२०] |
८ | काझुकी नाकाजिमा[१९] | सर्व | |||||||
रेड बुल रेसिंग | रेड बुल रेसिंग | रेड बुल आर.बी.४[२१] | रेनोल्ट आर.एस.२७ | ब | ९ | डेव्हिड कुल्टहार्ड[२२] | सर्व | ३५ | सॅबेस्टीयन बौमी[२३] |
१० | मार्क वेबर[२४] | सर्व | |||||||
पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग | टोयोटा रेसिंग | टोयोटा टी.एफ.१०८[२५] | टोयोटा आर.व्ही.एक्स.०८ | ब | ११ | यार्नो त्रुल्ली[२६] | सर्व | ३६ | कमुइ कोबायाशी[२७] |
१२ | टिमो ग्लोक[२८] | सर्व | |||||||
स्कुदेरिआ टोरो रोस्सो | स्कुदेरिआ टोरो रोस्सो | टोरो रोस्सो एस.टी.आर.२बी[२९] टोरो रोस्सो एस.टी.आर.३[३०] |
फेरारी ०५६ | ब | १४ | सेबास्तिआं बूर्दे[३१] | सर्व | ३७ | ब्रँड्न हार्टले[३२] |
१५ | सेबास्टियान फेटेल[३३] | सर्व | |||||||
होंडा रेसिंग एफ१ | होंडा रेसिंग एफ१ | होंडा आर.ए.१०८[३४] | होंडा आर.ए.८०८.इ | ब | १६ | जेन्सन बटन[३५] | सर्व | ३८ | एलेक्सांडर वुर्झ[३६] अँथनी डेविडसन[३७] माइक कॉन्वे[३८] लुका फिलिप्पी[३९] |
१७ | रुबेन्स बॅरीकेलो[४०] | सर्व | |||||||
सुपर आगुरी एफ१‡ | सुपर आगुरी एफ१ | सुपर आगुरी एस.ए.०८[४१] | होंडा आर.ए.८०८.इ | ब | १८ | ताकुमा सातो[३] | १-४ | ३९ | |
१९ | अँथनी डेविडसन[३] | १-४ | |||||||
फोर्स इंडिया | फोर्स इंडिया | फोर्स इंडिया व्ही.जे.एम.-०१[४२] | फेरारी ०५६[४३] | ब | २० | आद्रियान सुटिल[४४] | सर्व | ४० | विटांटोनियो लिउझी[४४] |
२१ | जियानकार्लो फिसिकेला[४४] | सर्व | |||||||
वोडाफोन मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ | मॅकलारेन | मॅकलारेन एम.पी.४-२३[४५] | मर्सिडीज एफ.ओ.१०८.व्ही | ब | २२ | लुइस हॅमिल्टन[४६] | सर्व | ४१ | पेड्रो डीला रोसा[४७] गॅरी पफेट्ट[४७] |
२३ | हेइक्कि कोवालायनन[४८] | सर्व |
- † सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
- ‡ सुपर आगुरी एफ१ संघाने माघार घेतली कारण त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती.
संघांमधील बदल
[संपादन]- २००७ च्या फॉर्म्युला वन हंगामात बऱ्याच अफवा पसरल्या होत्या की स्पायकर एफ१ संघाला कोणी तरी विकत घेणार आहे. फक्त एक वर्षा आधी स्पायकर कंपनीने मिडलॅन्डचा संघ विकत घेतला होता, व पुन्हा स्पायकर एफ१ला विजय मल्ल्याने ८८,०००,००० युरो देउन विकत घेतले.[४९]. ऑक्टोबर २४, इ.स. २००७ रोजी मल्ल्याला त्याच्या संघाचे नाव फोर्स इंडिया ठेवण्यास अनुमती मिळाली. फोर्स इंडियाने माग जानेवारी इ.स. २००८ रोजी एका सभेत जाहीर केले की जियानकार्लो फिसिकेला व आद्रियान सुटिल त्यांचे मुख्य चालक असतील व विटांटोनियो लिउझी त्यांचा परीक्षण चालक असेल.
- एप्रिल २८, इ.स. २००६ रोजी, एफ.आय.एने प्रोड्राइव्ह नावाच्या नवीन कंपनीला फॉर्म्युला वन मध्ये प्रवेश दिला. २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी एकूण २१ कंपन्यांनी भाग घेण्यासाठी अर्ज दिले होते. पण एफ.आय.ए फक्त १२ संघाना एखद्या हंगामात भाग घेऊ देत असल्यामुळे या हंगामात फ्कत एका नवीन संघाला जागा मिळाली.[५०]. परंतु नोव्हेंबर २३, इ.स. २००७ रोजी एफ.आय.एने जाहीर केले की प्रोड्राइव्ह एफ१ हे २००८ फॉर्म्युला वन हंगामात भाग नाही घेणार कारण काही कायदेशीर गोष्टींमुळे त्यांचा बराच वेळ गेला व आता त्यांना २००८ हंगामात भाग घेण्यासाठी वेळेवर संघ तैयार करण्यासाठी वेळ बाकी राहिला नाही आहे.[५१]
- २००८ फॉर्म्युला वन हंगामात सुपर आगुरी एफ१ संघाला माघार घ्यावी लागली कारण २००७ फॉर्म्युला वन हंगामाच्या शेवट पर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. कारण त्यांना एका कराराचे पैसे आले नव्ह्ते.[५२] स्पाईस ग्रुप नावाच्या एका भारतीय कंपनीने जानेवारी इ.स. २००८ मध्ये सुपर आगुरी एफ१ला विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यांनी तो नाकारला कारण स्पाईस ग्रुपने ही अट घातली होती की नरेन कार्तिकेयनला मुख्य चालक म्हणून नेमले जावे. सुपर आगुरी एफ१ला ही अट मान्य नव्हती कारण त्यांना त्यांच्या एका चालकाला काढून टाकावे लागले असते.[५३]. नंतर बऱ्याच प्रयत्नानंतरही सुपर आगुरी एफ१ला कोणत्या ही करार नाही करता आला.[५४] मार्च १०, इ.स. २००८ रोजी सुपर आगुरी एफ१ने त्यांचे मुख्य चालक म्हणून ताकुमा सातो व अँथनी डेविडसनची नेमणुक केली.[५५]सुपर आगुरी एफ१ने मग पुन्हा जाहीर केले की त्यांनी मॅग्मा ग्रुप बरोबर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरण्यासाठी एक करार केला आहे, पण शेवटी हा करार सुद्धा पूर्ण झाला नाही व शेवटी मे ६, इ.स. २००८ रोजी सुपर आगुरी एफ१ने फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली.[५६]
चालकांमधील बदल
[संपादन]- फर्नांदो अलोन्सोने मॅकलारेन संघ सोडून रेनोल्ट एफ१ संघात मुख्य चालक म्हणून प्रवेश केला.
- हिक्की कोवालाइनने रेनोल्ट एफ१ संघ सोडून मॅकलारेन संघात मुख्य चालक म्हणून प्रवेश केला.
- जियानकार्लो फिसिकेलाने रेनोल्ट एफ१ संघ सोडून फोर्स इंडिया संघात मुख्य चालक म्हणून प्रवेश केला.
- नेल्सन आंगेलो पिके जो रेनोल्ट एफ१ संघाचा परीक्षण चालक होता, त्याला मुख्य चालक म्हणून नेमण्यात आले.
- टिमो ग्लोक जो बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघाचा परीक्षण चालक होता, त्याने टोयोटा रेसिंग संघात मुख्य चालक म्हणून प्रवेश केला.
- विटांटोनियो लिउझीने स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघ सोडून फोर्स इंडिया संघात परीक्षण चालक म्हणून प्रवेश केला.
- काझुकी नाकाजिमा जो विलियम्स एफ१ संघाचा परीक्षण चालक होता, त्याला मुख्य चालक म्हणून नेमण्यात आले.
- अलेक्झांडर व्रुझने विलियम्स एफ१ संघ सोडून होंडा रेसिंग एफ१ संघात परीक्षण चालक म्हणून प्रवेश केला.
- ख्रिस्टियन क्लेन जो होंडा रेसिंग एफ१ संघाचा परीक्षण चालक होता, त्याने बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघात परीक्षण चालक म्हणून प्रवेश केला.
- सकोन यामामोटोने स्पायकर एफ१ संघ सोडून रेनोल्ट एफ१ संघात परीक्षण चालक म्हणून प्रवेश केला.
- सेबास्तिआं बूर्देने स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात मुख्य चालक म्हणून प्रवेश केला.
- मार्को अस्मेरने बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघात परीक्षण चालक म्हणून प्रवेश केला.
- राल्फ शुमाखरने टोयोटा रेसिंग संघ सोडून फॉर्म्युला वन मधुन संन्यास घेतला.
हंगामाचे वेळपत्रक
[संपादन]एफ.आय.ए संघटनेने २००८ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक ऑक्टोबर २४, इ.स. २००७ रोजी जाहीर केला. या हंगामात सिंगापूर ग्रांप्रीसाठी मरीना बे स्ट्रीट सर्किट व युरोपियन ग्रांप्रीसाठी वेलेंशिया स्ट्रीट सर्किट, या दोन नवीन सर्किटांचा समावेश करण्यात आला. सिंगापूर ग्रांप्री ही फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती.
स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल
[संपादन]- सिंगापूर या देशाने त्यांची सर्वात पहिली ग्रांप्री २००८ फॉर्म्युला वन हंगामात आयोजीत केली. त्यांनी एफ.आय.ए बरोबर, २०१२ पर्यंत सिंगापूर ग्रांप्री, आयोजीत करण्याचा करारनामा केला होता. सिंगापूर ग्रांप्री शर्यत ही एक "स्ट्रीट सर्किट" जातीची शर्यत आहे, व या सर्किटचे निर्माण के.बि.आर नावाच्या कंपनीने केले होते. ही ग्रांप्री फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती.[५७] व सराव आणि पात्रता फेऱ्या सुद्धा रात्री घेण्यात येतात.[५८]
- २००८ फॉर्म्युला वन हंगामात युरोपियन ग्रांप्री ही वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे आयोजीत करण्यात आली, या आधी युरोपियन ग्रांप्री नेहमी नुर्बुर्गरिंग येथे आयोजीत करण्यास येत असे. कारण वेलेंशिया स्ट्रीट सर्किट व नुर्बुर्गरिंग या दोघ्या जर्मन सर्किटांना फॉर्म्युला वन शर्यती आयोजीत करण्याची अनुमती मिळाली होती. म्हणून असे ठरवले गेले की दर वर्षी आळीपाळीने या दोघ्या सर्किटांवर फॉर्म्युला वन शर्यती आयोजीत करण्यात यावे. २००८ फॉर्म्युला वन हंगामात जर्मन ग्रांप्री ही हॉकेंहिम्रिंग येथे आयोजीत करण्यात आली.
- इंडियानापोलिस मोटर स्पीडवेने २००८ फॉर्म्युला वन हंगामात शर्यत नाही आयोजीत केली, पण पुढे शर्यत इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे आयोजीत नाही करणार असे ही सांगितले नाही[५९] कारण युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०१२ फॉर्म्युला वन हंगामात ऑस्टिन, टेक्सास येथे आयोजीत होणार आहे.
- सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स येथील २००७ फ्रेंच ग्रांप्री नंतर असे जाहीर केले गेले की, तेथे परत फ्रेंच ग्रांप्री आयोजीत नाही केली जाणार.[६०]. काही वैकल्पिक जागा सुचवण्यात आल्या ज्यामध्ये "पॉल रिचर्ड सर्किट", डिजनीलँड, पॅरीस जवळील एक सर्किट अणि "चर्लस डी गॉल्ल एयरपोर्ट"चा समावेश होता. पण जुलै २४, इ.स. २००७ रोजी असे जाहीर केले गेले की सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स येथेच २००८ फ्रेंच ग्रांप्री आयोजीत केली जाइल व इतर वैकल्प नसल्यावर, २००९ फ्रेंच ग्रांप्री सुद्धा तेथेच आयोजीत केली जाईल.[६१]
कायद्यांमधिल बदल
[संपादन]- मायक्रोसॉफ्ट व मॅकलारेन इलेक्ट्रॉनिक सिस्टिमस या दोघा कंपन्यांच्या भागीदारीतमुळे बनलेल्या "मायक्रोसॉफ्ट एम.इ.एस" या कंपनीने "इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट" हे ठरवीलेले यंत्राचा पुरवठा केला.[६२]
- ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल व इंजिन ब्रेकींग रिड्कशन या इलेक्ट्रॉनिक यंत्रांना प्रतिबंधीत करण्यात आले.[६३]
- २००८ पासून पुढील ५ वर्षे इंजिनमध्ये बदल करण्यास प्रतिबंध लागु करण्यात आला [६४] व एखाद्या हंगामात जर न ठरवता इंजिन बदलण्यात आले तर शर्यत सुरुवातील १० जागा मागे जाण्याचे दंड नाही लागु होणार.[६५]
- गाड्यांमधील इंधन हे कमीत कमी ५.७५% जिवाक्ष्णु मिश्रित असायला हवे.[६६]
- गियरबॉक्स कमीतकमी ४ शर्यतींपर्यंत चालायला हवा. जर त्यामध्ये बदलण्यात आला, तर शर्यत सुरुवातील ५ जागा मागे जाण्याचे दंड लागु होणार. जर एखाद्या चालकाने एखादी शर्यत पूर्ण नाही केली तर त्याला पुढच्या शर्यतीसाठी गियरबॉक्स बदल्यास परवानगी आहे.[६७]
- चालकाच्या बैठकीच्या जागेचे संरक्षण वाढवण्यात आले.[६८]
- जादा गाडीच्या वापरावर बंदी टाकण्यात आलेली व प्रत्येक संघाला दोनपेक्षा जास्त गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी आलेली होती. या संदर्भात गाडी म्हणजे अर्धवट बनवलेली गाडी ज्यामध्ये इंजिन, सस्पेन्शन, रेडियटर, तेल टाकी, साचा अथवा इतर गाडीचे भाग बसवलेले असल्यास, ती गाडी संपूर्ण गाडी म्हणून मानन्यात येईल.[६७]
- ब्रिजस्टोन या कंपनीला २००८ ते २०१० फॉर्म्युला वन हंगामा पर्यंत, सर्व शर्यतींसाठी अधिक्रुत टायर पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आले.[६९]. ब्रिजस्टोनला फॉर्म्युला वन शर्यतींसाठी अत्यंत ओल्या हवामानासाठी उपयुक्त असे टायर बनवण्यास नेमले गेले. या टायरांनामध्ये एक सफेद रंगाची रेषे आखण्यास सांगितले गेले, कारण त्यामुळे दुसऱ्या जातीच्या नरम ओल्या हवामानाचे टायर ओळखता येतील.[७०]
- कोणत्याही संघाला २००८ फॉर्म्युला वन हंगामात ३०,००० कि.मी. (१८,६४२ मैल) पेक्षा जास्त परीक्षण करण्यास बंदी आहे.[६७]
- पहील्या सराव फेरीची वेळ २० मिनीटांनी वाढवण्यात आली व शेवटच्या सराव फेरीची वेळ १० मिनीटांनी कमी करण्यात आली. शेवटच्या सराव फेरीत भाग घेणाऱ्या संघांना, मुख्य शर्यतीच्या सुरुवातीचे स्थान नेमण्यात आल्यावर पुन्हा गाडीमध्ये इंधन टाकण्यास मनाई करण्यात आली कारण, एकदा इंधन टाकल्यावर गाडीला पहील्या काही फेऱ्या, ते इंधन जाळण्यास कराव्यालागत व त्यामुळे दुसऱ्या संघांचा वेळ वाया जात असे.
- बहरैन ग्रांप्री पासून एक नियम लागु करण्यात आला, ज्या मध्ये मुख्य शर्यतीत पात्र ठरण्यासाठी, एक सर्कीट फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या वेळेत, एक वेळ ठरवण्यात आली. ज्या चालकाने ह्या कमीतकमी वेळेत पूर्ण फेरी नाही केली, तो चालक मुख्य शर्यतीसाठी अपात्र ठरेल. हा नियम लागु करण्यामागे कारण होते की, जेव्हा एखादी कार पिट्सकडे वळायाची तेव्हा ते कमी वेगात जायचे, जे मागून येणाऱ्या दुसऱ्या गांड्यांसाठी धोकादायक ठरले असते. २००८ मलेशियन ग्रांप्री मध्ये असेच घडले होते, जेव्हा लुइस हॅमिल्टन व हिक्की कोवालाइन पिट्सकडे वळले व त्यामूळे निक हाइडफेल्ड व फर्नांदो अलोन्सोला अडथळा निर्माण झाला होता. लुइस हॅमिल्टन व हिक्की कोवालाइनच्या या चुकीमुळे त्यांना मुख्य शर्यतीत सुरुवातील ५ जागा मागे जाण्याचे दंड लागु झाले. प्रत्येक शर्यतीत हा कमीतकमी फेरी वेळ, वेगळा ठेवण्यात आला होता, उदा. बहरैन ग्रांप्रीसाठी १:३९ मिनीटे कमीतकमी फेरी वेळ ठरवण्यात आला होता.
- फॉर्म्युला वन मधुन सुपर आगुरी एफ१च्या मागारा नंतर, मुख्य शर्यतीसाठीची पात्रता पधती बदलण्यात आली. मे ८, इ.स. २००८ रोजी एफ.आय.एने शर्यतीच्या पात्रतेचे नवीन नियम जाहीर केले. पहिल्या सराव फेरीत आता ५ चालक अपात्र ठरतील ज्यांचा सारावातील फेरी वेळ इतरांपेक्षा जास्त असेल. आधी ६ चालक अपात्र ठरत असत. यामुळे आता जास्त चालक दुसऱ्या सराव फेरीसाठी पात्र ठरत. दुसऱ्या ते तिसऱ्या फेरीच्या पात्रता नियमांमध्ये काही बदल नाही करण्यात आला.[७१]
हंगामाअधिल परीक्षणाची माहीती
[संपादन]सर्वात पहील्या परीक्षण सत्राची सुरुवात जानेवारी १४, इ.स. २००८ रोजी सर्किटो डी जेरेझ येथे झाली. स्कुदेरिआ फेरारी, मॅकलारेन आणि टोयोटा रेसिंग या कारनिर्मात्या संघांनी त्यांच्या २००८ फॉर्म्युला वन हंगामात चालवण्याच्या गाड्यांचे परीक्षण केले. विलियम्स एफ१ने त्यांची रूपांतरीत केलेल्या विलियम्स एफ.डब्ल्यु.२९ गाडीचे परीक्षण केले व रेनोल्ट एफ१ आणि रेड बुल रेसिंग कारनिर्मात्या संघांनी त्यांच्या २००७ फॉर्म्युला वन हंगामात सामील झालेल्या गाड्यांचे परीक्षण केले. होंडा रेसिंग एफ१, स्कुदेरिआ टोरो रोस्सो, सुपर आगुरी एफ१ आणि फोर्स इंडिया कारनिर्मात्या संघांनी सुद्दा या परीक्षण सत्रात भाग घेतले. बी.एम.डब्ल्यू. सौबर या संघाने भाग नाही घेतला कारण ते त्यांची बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०८ गाडी तैयार करण्यात गुंतलेले होते.[७२]
मग जानेवारी २२, इ.स. २००८ रोजी परीक्षण सर्किट डी वालेन्सिया येथे हलवण्यात आले. पहील्या दिवशी फक्त रेनोल्ट आणि विलियम्स हजर झाले व त्यांनी त्यांच्या या हंगामात चालवीण्यात येणाऱ्या गाड्यांचे परीक्षण केले.[७३]. पुढच्या तीन दिवसात सुपर आगुरी एफ१ संघ सोडून बाकी सर्व संघ सर्किट डी वालेन्सिया येथील परीक्षणात सामील झाले. पुढे हे परीक्षण फेब्रुवारी १, इ.स. २००८ रोजी सर्किट डी काटलुन्या येथे हलवण्यात आले व पुन्हा सुपर आगुरी एफ१ संघ सोडून बाकी सर्व संघ परीक्षणात सामील झाले. परीक्षणाच्या पहिल्याच दिवशी काझुकी नाकाजिमाने त्याची विलियम्स एफ.डब्ल्यु.३० गाडीचा अपघात केला.[७४] व लुइस हॅमिल्टन वर वंशविव्देष करण्यात आला. विलियम्स एफ१ला तिसऱ्या दिवशी परीक्षणातुन माघार घ्यावी लागली कारण त्यांना काझुकी नाकाजिमाच्या गाडीच्या अपघाता नंतर आलेले बिघाड सुधरवयाचे होते. पुढे फेब्रुवारी ४, इ.स. २००८ रोजी स्कुदेरिआ फेरारी आणि टोयोटा एफ१, हे दोघे संघ त्यांच्या फेरारी एफ.२००८ व टोयोटा टी.एफ.१०८[७५] गाड्यांच्या परीक्षणासाठी बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे गेले. पुढे हे परीक्षण फेब्रुवारी १२, इ.स. २००८ रोजी सर्किटो डी जेरेझ येथे पुन्हा सुरू झाले. पहिल्या दिवशी रेड बुल रेसिंग आणि विलियम्स एफ१ संघांनीच परीक्षण केले.[७६]. दुसऱ्या दिवशी स्कुदेरिआ फेरारी आणि टोयोटा एफ१ सोडून बाकी सरव्या संघानी परीक्षण केले. स्कुदेरिआ फेरारी आणि टोयोटा एफ१ हे दोघे संघ बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे परीक्षण करत असल्यामुळे, सर्किटो डी जेरेझ येथील परीक्षणात सहभागी नाही होऊ शकले. सर्किटो डी जेरेझ येथे परीक्षणासाठी सुपर आगुरी एफ१ संघ पहिल्यांदा सामील झाले, व त्या संघने तेथे सुपर आगुरी एस.ए.०७.बी या गाडीचे परीक्षण केले. या गाडीच्या परीक्षणाआधी त्यांना त्यांच्या सुपर आगुरी एस.ए.०८ गाडीचे उदघाटन पुढे ढकलवे लागले व सर्किट डी वालेन्सिया येथील परीक्षणात सुद्दा सामील नाही होता आले.[७७]
पुढे हे परीक्षण फेब्रुवारी १९, इ.स. २००८ रोजी सर्किट डी काटलुन्या येथे सुरू झाले. बी.एम.डब्ल्यू. सौबर संघ सर्किटो डी जेरेझ येथे परीक्षण करत असल्यामुळे सामील नाही झाले.[७८] व सुपर आगुरी एफ१ संघाने दुरचित्रवाहीणी व व्रूतपत्राच्या वार्ताहारांना प्रश्न-उत्तराच्या सभेचे आश्वासन दिले असतानाही, ते तेथे हाजर नाही जाले. सुपर आगुरी एफ१ संघाने त्यांची वास्तु स्थिती त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे, त्यांना हाजर नाही होता आले असे कारण सांगितले. पहिल्या दिवशी परीक्षणावेळेत सर्किट डी काटलुन्या येथे खुप पाऊस झाला, तरीपण रेड बुल रेसिंग, विलियम्स एफ१, रेनोल्ट एफ१ आणि टोयोटा एफ१ संघ परीक्षणासाठी सामील झाले. निको रॉसबर्गने विलियम्स एफ१साठी त्या दिवसाची सर्वात जलद फेरी मारुन, अव्वल वेळ नोंदवला.
परीक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्कुदेरिआ फेरारी सामील झाले, व फिलिपे मास्साने पाउस पडत असतांनाही त्यांच्यासाठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला. परीक्षणाच्या शेवटच्या दिवशी मॅक्लरीन सुद्दा सामील झाले व काझुकी नाकाजिमाने विलियम्स एफ१साठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला. शेवटचे परीक्षण फेब्रुवारी २५, इ.स. २००८ रोजी सुरू झाले व सुपर आगुरी एफ१ संघ सोडून बाकी सर्व संघ परीक्षणात सामील झाले. पहिल्या दिवशी लुइस हॅमिल्टनने मॅक्लरीनसाठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला. त्याने स्कुदेरिआ फेरारी संघाच्या किमी रायकोन्नेन व मिखाएल शुमाखरला मागे टाकत हा वेळ नोंदवला. परीक्षणाच्या दुसऱ्या दिवशी मॅक्लरीनने स्कुदेरिआ फेरारीवर वर्चस्व ठेवत दोघ्या मॅक्लरीन चालकांनी स्कुदेरिआ फेरारीच्या चालकांना मागे टाकले व शेवटच्या दिवशी यार्नो त्रुल्ली ने टोयोटा एफ१साठी त्या दिवसाचा अव्वल वेळ नोंदवला.
हंगामाचा आढावा
[संपादन]२००८ फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन खेळातील सर्वात चुरशीच्या लढतीच्या सामन्यांचा हंगाम होता. किमी रायकोन्नेनने लुइस हॅमिल्टनला पहील्या अर्ध्या हंगाम चुरशीची लढत दिली व दुसऱ्या अर्ध्या हंगामात फिलिपे मास्साने त्याला चांगलेच आव्हान दिले. पण शेवटी लुइस हॅमिल्टनने फिलिपे मास्साकडुन फक्त एका गुणावरून २००८ चे अजिंक्यपद पटकावले.
हंगामाचे निकाल
[संपादन]ग्रांप्री
[संपादन]चालक
[संपादन]
|
|
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्माते
[संपादन]क्र. | कारनिर्माता | गाडी क्र. | ऑस्ट्रे |
मले |
बहरैन |
स्पॅनिश |
तुर्किश |
मोनॅको |
कॅनेडी |
फ्रेंच |
ब्रिटिश |
जर्मन |
हंगेरी |
युरोपि |
बेल्जि |
इटालि |
सिंगापू |
जपान |
चिनी |
ब्राझि |
गुण |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | स्कुदेरिआ फेरारी | १ | ८† | १ | २ | १ | ३ | ९ | मा. | २ | ४ | ६ | ३ | मा. | १८† | ९ | १५† | ३ | ३ | ३ | १७२ |
२ | मा. | मा. | १ | २ | १ | ३ | ५ | १ | १३ | ३ | १७† | १ | १ | ६ | १३ | ७ | २ | १ | |||
२ | मॅक्लरीन-मर्सिडिज | २२ | १ | ५ | १३ | ३ | २ | १ | मा. | १० | १ | १ | ५ | २ | ३ | ७ | ३ | १२ | १ | ५ | १५१ |
२३ | ५ | ३ | ५ | मा. | १२ | ८ | ९ | ४ | ५ | ५ | १ | ४ | १० | २ | १० | मा. | मा. | ७ | |||
३ | बी.एम.डब्ल्यू. सौबर | ३ | २ | ६ | ४ | ९ | ५ | १४ | २ | १३ | २ | ४ | १० | ९ | २ | ५ | ६ | ९ | ५ | १० | १३५ |
४ | मा. | २ | ३ | ४ | ४ | २ | १ | ५ | मा. | ७ | ८ | ३ | ६ | ३ | ११ | २ | ६ | ११ | |||
४ | रेनोल्ट एफ१ | ५ | ४ | ८ | १० | मा. | ६ | १० | मा. | ८ | ६ | ११ | ४ | मा. | ४ | ४ | १ | १ | ४ | २ | ८० |
६ | मा. | ११ | मा. | मा. | १५ | मा. | मा. | ७ | मा. | २ | ६ | ११ | मा. | १० | मा. | ४ | ८ | मा. | |||
५ | टोयोटा एफ१ | ११ | मा. | ४ | ६ | ८ | १० | १३ | ६ | ३ | ७ | ९ | ७ | ५ | १६ | ११ | मा. | ५ | मा. | ८ | ५६ |
१२ | मा. | मा. | ९ | ११ | १३ | १२ | ४ | ११ | १२ | मा. | २ | ७ | ९ | १३ | ४ | मा. | ७ | ६ | |||
६ | स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी | १४ | ७† | मा. | १५ | मा. | मा. | मा. | १३ | १७ | ११ | १२ | १८ | १० | ७ | १८ | १२ | १० | १३ | १४ | ३९ |
१५ | मा. | मा. | मा. | मा. | १७ | ५ | ८ | १२ | मा. | ८ | मा. | ६ | ५ | १ | ५ | ६ | ९ | ४ | |||
७ | रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ | ९ | मा. | ९ | १८ | १२ | ९ | मा. | ३ | ९ | मा. | १३ | ११ | १७ | ११ | १६ | ७ | मा. | १० | मा. | २९ |
१० | मा. | ७ | ७ | ५ | ७ | ४ | १२ | ६ | १० | मा. | ९ | १२ | ८ | ८ | मा. | ८ | १४ | ९ | |||
८ | विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग | ७ | ३ | १४ | ८ | मा. | ८ | मा. | १० | १६ | ९ | १० | १४ | ८ | १२ | १४ | २ | ११ | १५ | १२ | २६ |
८ | ६ | १७ | १४ | ७ | मा. | ७ | मा. | १५ | ८ | १४ | १३ | १५ | १४ | १२ | ८ | १५ | १२ | १७ | |||
९ | होंडा रेसिंग एफ१ | १६ | मा. | १० | मा. | ६ | ११ | ११ | ११ | मा. | मा. | १७ | १२ | १३ | १५ | १५ | ९ | १४ | १६ | १३ | १४ |
१७ | अ.घो. | १३ | ११ | मा. | १४ | ६ | ७ | १४ | ३ | मा. | १६ | १६ | मा. | १७ | मा. | १३ | ११ | १५ | |||
१० | फोर्स इंडिया-स्कुदेरिआ फेरारी | २० | मा. | मा. | १९ | मा. | १६ | मा. | मा. | १९ | मा. | १५ | मा. | मा. | १३ | १९ | मा. | मा. | मा. | १६ | ० |
२१ | मा. | १२ | १२ | १० | मा. | मा. | मा. | १८ | मा. | १६ | १५ | १४ | १७ | मा. | १४ | मा. | १७ | १८ | |||
११ | सुपर आगुरी एफ१-होंडा रेसिंग एफ१‡ | १८ | मा. | १६ | १७ | १३ | WD | ० | |||||||||||||
१९ | मा. | १५ | १६ | मा. | WD | ||||||||||||||||
क्र. | कारनिर्माता | गाडी क्र. | ऑस्ट्रे |
मले |
बहरैन |
स्पॅनिश |
तुर्किश |
मोनॅको |
कॅनेडी |
फ्रेंच |
ब्रिटिश |
जर्मन |
हंगेरी |
युरोपि |
बेल्जि |
इटालि |
सिंगापू |
जपान |
चिनी |
ब्राझि |
गुण |
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
- Bold - Pole
- Italics - Fastest Lap
|
|
|
हे सुद्धा पहा
[संपादन]- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
[संपादन]- ^ "२००८ फॉर्म्युला वन हंगामचे अजिंक्यपद वर्गवारी". 2010-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "लुइस हॅमिल्टन सर्वात लहान वयात अजिंक्यपद जिंकणारा या पदवीच्या मानकरी". 2012-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ a b c "२००८ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ".
- ^ "फेरारी एफ.२००८ ने त्यांची फेरारी एफ.२००८ गाडी प्रदर्शीत केली". 2008-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "फेरारीने २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी किमी रायकोन्नेन आणि फिलिपे मास्सा, हे संगाचे चालक असण्याची पुष्टी केली". 2007-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ a b "फेरारीचे चालक ".
- ^ "मिखाएल शुमाखर, फेरारीचा परीक्षण चालक".
- ^ "फेरारीने फिलिपे मास्साचा करार २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत वाढवला". 2007-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-११-२४ रोजी पाहिले.
- ^ "राम्फच्या मते फ.१.०८ एक क्रांतीकारी गाडी आहे".
- ^ a b "बी.एम.डब्ल्यू. सौबर संघाने निक हाइडफेल्ड आणि रोबेर्ट कुबिचाला २००८ फॉर्म्युला वन हंगामासाणी टिकवून ठेवले". 2008-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-०२-०६ रोजी पाहिले.
- ^ a b "ख्रिस्टियन क्लेन आणि मार्को अस्मेर, बी.एम.डब्ल्यू. सौबर संघाग, परीक्षण चालक म्हणुन दाखल". 2008-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-20 रोजी पाहिले.
- ^ "रेनोल्ट आर.२८ चांगल्या टायर कामगिरीसाठी तैयार केली आहे".
- ^ "२००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी फर्नांदो अलोन्सो व नेल्सन आंगेलो पिके रेनोल्ट एफ१ संघात भागीदारी करणार". 2007-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "रेनोल्ट एफ१ संघात,लुकास डी ग्रासी तिसरा चालक म्हणुन नेमला गेला".
- ^ "रोमन ग्रोस्जीनला या हंगामाकढुन अपेक्षा".
- ^ "रेनोल्ट एफ१ संघाने, सकोन यामामोटो सोबत परीक्षण चालक म्हणुन करार केला".
- ^ "विलियम्स एफ१ संघाची नवीन गाडी".
- ^ "विलियम्स एफ१ संघाच्या नवीन गाडीत टोयोटाचे इंजिन".
- ^ a b "विलियम्स एफ१ संघाने पुष्टी केली की २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी निको रॉसबर्ग आणि काझुकी नाकाजिमा त्यांचे मुख्य चालक आहेत". 2007-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "निको हल्केनबर्ग, विलियम्स एफ संघाचा २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी परीक्षण चालक". 2012-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "रेड बुल रेसिंग त्यांची रेड बुल आर.बी.४ गाडी जेरेझ येथील ग्रांपीला प्रर्दशित करणार".
- ^ "रेड बुल रेसिंगने डेव्हिड कुल्टहार्डला २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी नेमले". 2008-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "रेड बुल रेसिंगने सॅबेस्टीयन बौमी २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी परीक्षण व राखीव चालक म्हणुन नेमले". 2008-01-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-20 रोजी पाहिले.
- ^ "मार्क वेबरने २००८ फॉर्म्युला वन हंगामात, माघील हंगामापेक्षा चांगले काम करण्याचा हेतू ठेवला".
- ^ "लांब व्हीलबेस,हि संकल्पना टोयोटाने त्याच्यां नवीन गाडीत टाकली".
- ^ "यार्नो त्रुल्लीने टोयोटाबरोबर राहण्याचा शब्द दिला".[मृत दुवा]
- ^ "कमुइ कोबायाशी टोयोटा रेसिंग संघाचा तिसरा चालक असण्याची टोयोटाने घोषणा केली". 2011-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "टिमो ग्लोक टोयोटा रेसिंग संघासाठी २००८ फॉर्म्युला वन हंगामात चालवणार". 2007-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "सेबास्टियान फेटेल २००८ फॉर्म्युला वन हंगामाची सुरवात, २००७ फॉर्म्युला वन हंगामातील गाडी वापरुन केल्याने काही फायदे असतील".
- ^ "स्कुदेरिआ टोरो रोस्सोची नवीन गाडी स्पेन ग्रांपीला घावणार".
- ^ "सेबास्तिआं बूर्दे २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल". 2008-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "ब्रँड्न हार्टले २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी स्कुदेरिआ टोरो रोस्सोचा परीक्षण चालक". 2008-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "सेबास्टियान फेटेल २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात राहणार". २००८-०२-०९ रोजी पाहिले.[मृत दुवा]
- ^ "होंडा रेसिंग एफ१ने प्रत्येक शर्यतीत गुण मिळवण्याचे लक्ष्य मांडले आहे". 2008-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-20 रोजी पाहिले.
- ^ "होंडा रेसिंग एफ१ने जेन्सन बटन आणि रुबेन्स बॅरीकेलो टिकवले".[permanent dead link]
- ^ "एलेक्सांडर वुर्झने होंडा रेसिंग एफ१ संघाबरोबर परीक्षण आणि राखीव चालकाचा करार केला". 2008-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-०२-०९ रोजी पाहिले.
- ^ "अँथनी डेविडसन, होंडा रेसिंग एफ१ संघासाठी बार्सिलोना ग्रांपीला परीक्षण चालक्क म्हणुन परत येणार". 2009-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "होंडा रेसिंग एफ१ - चालक यादी". 2009-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "लुका फिलिप्पीला फॉर्म्युला १ मध्ये गाडी चालवयाला भेटेल, हि आशा".
- ^ "रुबेन्स बॅरीकेलो २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी होंडा रेसिंग एफ१ संघात राहणार". 2008-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "सुपर आगुरी एफ१ संघ त्यांची नवीन गाडी [[फेब्रुवारी]] मध्ये उद्घाटन करणार". URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "फोर्स इंडियाने मुंबईच्या उद्घाटनात एक नवीन युगात प्रवेश केला".
- ^ "विशेष मुलाखत - स्पाईकरचे डॉ. विजय माल्या".
- ^ a b c "जियानकार्लो फिसिकेला, आद्रियान सुटिल, विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया संघात आल्याची पुष्टी". २००७-०२-११ रोजी पाहिले.
- ^ "मॅकलारेन त्यांची नवीन गाडी, मॅकलारेन एम.पी.४-२३, स्टटगर्ट मध्ये उद्घाटन करणार". 2008-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "लुइस हॅमिल्टनने मॅकलारेन संघात २०१२ फॉर्म्युला वन हंगाम पर्यंत राहण्याचा शब्द दिला".
- ^ a b "हेइक्कि कोवालायनन मॅकलारेन संघात प्रवेश".
- ^ "हेइक्कि कोवालायनन, लुइस हॅमिल्टन सोबत २००८ फॉर्म्युला वन हंगामात मॅकलारेन मधुण खेळणार". 2014-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-20 रोजी पाहिले.
- ^ "स्पायकर एफ१चे नवीन मालक". 2007-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "प्रोड्राइव्ह एफ१हा २००८ फॉर्म्युला वन हंगामाचा १२व संघ". 2007-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "प्रोड्राइव्ह एफ१ २००८ हंगामात भाग नाही घेणार". 2007-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "सुपर आगुरी एफ१ने ३० नोकऱ्या कमी केल्या".
- ^ "एका भारतीय कंपनीचा सुपर आगुरी एफ१ला विकत घेण्याचा प्रस्ताव".
- ^ "ताकुमा सातो आणि अँथनी डेविडसनची जागा अजून पक्की नाही".
- ^ "सुपर आगुरी एफ१ने २००८ फॉर्म्युला वन हंगामासाठी नवीन भागिदर व चालक जाहीर केले". 2008-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "सुपर आगुरी एफ१ने फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली".
- ^ "सिंगापूर येथे २००८ हंगामातील रात्री चालणारी शर्यत". 2015-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "सिंगापूर ग्रांप्रीसाठी सराव आणि पात्रता फेऱ्या रात्री चालणार". 2008-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "इंडियानापोलिस २००८ फॉर्म्युला वन हंगामात अमेरिकन ग्रांप्री नाही आयोजीत करणार". २००७-०७-१२.
- ^ "फ्रेंच ग्रांप्री संकटात". 2008-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स येथेच आयोजीत होणार.
- ^ "मायक्रोसॉफ्ट व मॅकलारेन इलेक्ट्रॉनिक सिस्टिमसने इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटचे पुरवठा करण्याचे आश्वासन दिले".
- ^ "ट्रॅक्शन कंट्रोल २००८ फॉर्म्युला वन हंगामात प्रतिबंधीत". 2007-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "इंजिनमध्ये बदल करण्यास प्रतिबंध ५ वर्ष करण्यात आला".
- ^ "सर्व संघानी इंजिन बदल्यावर लागु होणाऱ्या दंडाच्या नियमाचे बद्दल झाल्याचे समर्थन केले". 2008-01-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "२००८ फॉर्म्युला वन हंगामातील नियमातील बदल".
- ^ a b c "२००८ फॉर्म्युला वन हंगामातील नवीन नियम". 2008-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "२००८ फॉर्म्युला वन हंगामात चालकाच्या बैठकीच्या जागेचे संरक्षण वाढणार".
- ^ "फक्त ब्रिजस्टोन हे टायर पुरवठा करण्यास नेमले गेले".[permanent dead link]
- ^ "ब्रिजस्टोन अत्यंत ओल्या हवामानासाठी उपयुक्त असे टायरांवर सफेद रंगाची रेष आखतील".
- ^ "सुपर आगुरी एफ१च्या मागारा नंतर, मुख्य शर्यतीसाठीची पात्रता पधती बदलण्यात आली". 2009-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "स्पेन येथे २००८ फॉर्म्युला वन हंगामाची सुरवात".
- ^ "वालेन्सिया पहिला दिवस - अलोन्सोचा पुढाकार". 2008-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "बार्सिलोना येथे पहिला दिवस - हॅमिल्टनने बनवले आदर्श". 2008-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "बहरैन येथे पहिल्या दिवस - फेरारी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर".
- ^ "जेरेझ येथे पहिला दिवस - स्पेन येथे रेड बुलची विलियम्स वर आघाडी". 2008-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "जेरेझ येथे दुसरा दिवस – मॅक्लरीनची जबरदस्त सुरवात". 2008-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.
- ^ "बार्सिलोना पहिला दिवस - रॉसबर्गने पावसात बनवले नवीन आदर्श". 2008-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-05 रोजी पाहिले.