मे ९
Appearance
मे ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२९ वा किंवा लीप वर्षात १३० वा दिवस असतो.
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अकरावे शतक
[संपादन]- १०९२ - इंग्लंडच्या लिंकनशायर काउंटीत लिंकन कॅथेड्रल खुले.
पंधरावे शतक
[संपादन]- १४५० - तैमुर लंगचा नातू अब्द अल लतीफची हत्या.
सोळावे शतक
[संपादन]- १५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर नव्या जगाकडे निघाला.
सतरावे शतक
[संपादन]- १६७१ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
- १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
- १८७७ - पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
विसावे शतक
[संपादन]- १९०१ - मेलबॉर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू.
- १९१४ - जे.टी. हर्न प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला.
- १९१५ - पहिले महायुद्ध - आर्त्वाची दुसरी लढाई.
- १९२७ - ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे नवीन राजधानी कॅनबेरा येथील पहिले अधिवेशन सुरू.
- १९३६ - इटलीने इथियोपिया बळकावले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या यु.९ या पाणबुडीने फ्रांसची डोरिस या पाणबुडीचा नाश केला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची यु.११० ही पाणबुडी ब्रिटिश आरमाराने पकडली. यातून एनिग्मा हे सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्याचे यंत्र मिळाले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - बेलग्रेडमध्ये ज्यू व्यक्तिंची सैनिकांकडून सामूहिक हत्या.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने हरमान गोरिंगला पकडले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या सैन्याने व्हिडकुन क्विसलिंगला पकडले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने प्रागमध्ये प्रवेश केला.
- १९४६ - इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने पदत्याग केला. उंबेर्तो दुसरा राजेपदी.
- १९४९ - रैनिये तिसरा मोनॅकोच्या राजेपदी.
- १९५५ - पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये प्रवेश.
- १९५६ - टी. इमानिशी व ग्याल्झेन नोर्बु यांनी नेपाळ मधील मनस्लौ शिखर सर केले.
- १९६० - अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी.
- १९७० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेत ८०,००० व्यक्तिंची व्हाईट हाउस समोर निदर्शने.
- १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या विधीमंडळाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनविरुद्ध महाभियोग सुरू केला.
- १९८० - फ्लोरिडातील सनशाईन स्कायवे ब्रिजला लायबेरियाच्या मालवाहू जहाज एस.एस. समिट व्हेन्चरची धडक. ३५ ठार.
- १९८७ - पोलंडच्या लॉट एरलाइन्सचे आय.एल.६२एम. जातीचे विमान वॉर्सोच्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार.
- १९९२ - प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया येथील वेस्ट्रे खाणीत स्फोट. २६ कामगार ठार.
- १९९४ - नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
- २००४ - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात चेच्न्याच्या राष्ट्राध्यक्ष अखमद काडिरोव्हचा मृत्यू.
- २००६ - तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.
जन्म
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- ११४७ - मिनामोटोनो योरिमोटो, जपानी शोगन.
- १४३९ - पोप पायस तिसरा.
- १५४०: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप
- १८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
- १८३७ - ऍडम ओपेल, जर्मन अभियंता.
- १८६६ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
- १८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे
- १८९२ - झिटा, ऑस्ट्रियाची साम्राज्ञी.
- १९०१ - जॉर्ज डकवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - मॅन्फ्रेड आयगेन, जर्मन जैवभौतिकशास्त्रज्ञ.
- १९२८ - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
- १९३२ - कॉन्राड हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - जॉन ऍशक्रॉफ्ट, अमेरिकन सेनेटर.
- १९४३ - मॉरिस फॉस्टर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - अँड्रु जोन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - अशांत डिमेल, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १३३८: भगवद्भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला.
- १४४६ - मेरी, नेपल्सची राणी.
- १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
- १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
- १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
- १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
- १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
- १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
- १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
- १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा .
- १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
- २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
- २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
- २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक थॅलस्सेमिया दिन.
- विजय दिन - रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.
- युरोप दिन - युरोपीय संघ.
- मुक्ति दिन - जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
- स्वातंत्र्य दिन : रोमानिया
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)