पार्थेनॉन
Appearance
पार्थेनॉन (प्राचीन ग्रीक: Παρθενών) हे अथेन्सच्या अॅक्रोपोलिसवरील अथेना ह्या ग्रीक देवीचे एक मंदिर आहे. पार्थेनॉनचे बांधकाम इ.स.पू. ४४७ साली सुरू झाले व इ.स.पू. ४३२ साली हे मंदिर बांधून पूर्ण करण्यात आले. पार्थेनॉन ही आजवर टिकलेली प्रागैतिहासिक ग्रीक साम्राज्यामधील सर्वात महत्त्वाची इमारत आहे.
तत्कालीन ग्रीसमधील इतर मंदिरांप्रमाणे पार्थेनॉनचा वापर देखील तिजोरी ठेवण्यासाठी होत असे. पाचव्या शतकामध्ये ह्या मंदिराचे रूपांतर एका ख्रिश्चन चर्चमध्ये करण्यात आले तर १५ व्या शतकादरम्यान ओस्मानी साम्राज्याने पार्थेनॉनचा मशीद म्हणून वापर केला. त्या काळात पार्थेनॉनवर एक मिनार देखील बांधण्यात आला होता. २६ सप्टेंबर १६८७ रोजी एका लढाईदरम्यान पार्थेनॉनचा मोठा भाग उध्वस्त झाला.
गॅलरी
[संपादन]-
दक्षिणेकडून
-
इमारतीची पडझड
-
पार्थेनॉनचे रात्रीच्या वेळचे दृष्य
-
जीर्णोद्धार
-
अमेरिकेच्या नॅशव्हिल शहरामधील पार्थेनॉनची प्रतिकृती
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-09-18 at the Wayback Machine.
- अॅक्रोपोलिस जीर्णोद्धार प्रकल्प Archived 2013-11-24 at the Wayback Machine.
- अथेन्सचे अॅक्रोपोलिस - युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |