Jump to content

दुसरे बाल्कन युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुसरे बाल्कन युद्ध
बाल्कन युद्धे ह्या युद्धाचा भाग
बल्गेरियन सैनिक
बल्गेरियन सैनिक
दिनांक २९ जून, १९१३१० ऑगस्ट, १९१३
स्थान बाल्कन द्वीपकल्प
परिणती बल्गेरियाचा पराभव
युद्धमान पक्ष
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया सर्बिया
रोमेनिया ध्वज रोमेनिया
ग्रीस
मॉंटेनिग्रो
ओस्मानी साम्राज्य
सैन्यबळ
५ लाख + १० लाख +

दुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रोरोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावरून जून १९१३ मध्ये बल्गेरियाने ग्रीससर्बियावर आक्रमण केले. बल्गेरियाच्या रोमेनियासोबतच्या वादामुळे रोमेनियाने देखील ह्या युद्धात सामील होण्याचे ठरवले. युद्धाचा फायदा घेऊन ओस्मानी साम्राज्याने पहिल्या युद्धादरम्यान गमावलेला काही भूभाग परत मिळवला.

सुमारे दीड महिन्यांच्या संघर्षानंतर बल्गेरियाने माघार घेतली. रशियाने ह्या युद्धात न पडण्याचे ठरवल्यामुळे रशिया-बल्गेरिया दोस्ती संपुष्टात आली. ह्याची परिणती रशिया-सर्बिया संबंध बळकट होण्यात झाली ज्यामुळे बाल्कन प्रदेशामध्ये सर्बियाचे वर्चस्व वाढले. ह्यामधूनच ऑस्ट्रिया-हंगेरी व सर्बियामधील संघर्षाला सुरुवात झाली ज्याचे रूपांतर पहिल्या महायुद्धामध्ये झाले. ह्या कारणास्तव दुसरे बाल्कन युद्ध साधारणपणे पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत मानले जाते.