Jump to content

जयप्रद देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयप्रद देसाई हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता आहेत. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या नागरिक या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.[][] संगीतकार वसंत देसाई यांचे ते नातू आहेत.[]

जयप्रद देसाई
जन्म २२ डिसेंबर १९८०
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, लेखक, निर्माता
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१५ -आजपर्यंत
प्रमुख चित्रपट नागरीक, हुतात्मा, कोण प्रवीण तांबे? (चित्रपट), मुखबीर- द स्टोरी ऑफ अ स्पाय, फिर आयी हसीन दिलरुबा
वडील उमाकांत देसाई
आई शारदा देसाई

व्यक्तिगत जीवन

[संपादन]

जयप्रद देसाई यांचा जन्म २२ डिसेंबर १९८० रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव शारदा आणि वडिलांचे नाव उमाकांत देसाई असून जयप्रद देसाई यांना त्यांच्या घरातूनच कलेचा वारसा मिळाला.

शिक्षण

[संपादन]

जयप्रद देसाई यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.देसाई यांना कॉलेजमध्ये असतानाच कलेची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक, सहाय्यक कोरिओग्राफर म्हणून काम केले. २००६ मध्ये त्यांची न्यू यॉर्क विद्यापीठात MFA (लेखन आणि दिग्दर्शन) प्रवेशासाठी निवड झाली.[]

कारकीर्द

[संपादन]

जयप्रद देसाई यांनी २०१५ या वर्षी दिग्दर्शित केलेला नागरिक हा रहस्यमय राजकीय चित्रपट असून या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. MAMI आणि IFFI सारख्या अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये देखील त्याची निवड झाली होती.[]

त्यानंतर त्यांनी हुतात्मा (वर्ष २०१९) ही ऐतिहासिक-काल्पनिक, रोमांचक वेब सिरीज तयार केली.[] समीक्षकांद्वारे तसेच प्रेक्षकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हुतात्माला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजसह मटा सन्मान पुरस्कार मिळाला.[]

२०२२मध्ये देसाई यांनी कोण प्रवीण तांबे? हा हिंदी भाषेतील चरित्रात्मक क्रीडा नाट्यपट दिग्दर्शित केला.[] हा चित्रपट क्रिकेट खेळाडू प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्याने वयाच्या ४१ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात श्रेयस तळपदे यांनी प्रवीण तांबे यांची भूमिका केली आहे. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार २०२२ साठी नामांकन मिळाले होते.[]

मुखबीर- द स्टोरी ऑफ अ स्पाय ही जयप्रद देसाई लिखीत आणि दिग्दर्शित हिंदी वेब सिरीज २०२२ या वर्षी प्रदर्शित झाली.[१०] या वेब सिरीजला सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा आणि संवाद यासाठी अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज साठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार २०२२ मध्ये देखील नामांकन मिळाले होते.[११]

अलीकडेच जयप्रद देसाई यांचा फिर आयी हसीन दिलरुबा (२०२४) हा अद्भुतरम्य हिंदी चित्रपट ९ऑगस्ट २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.[१२]

चित्रपट यादी

[संपादन]
वर्ष चित्रपट भाषा भूमिका
२०१५ नागरिक मराठी दिग्दर्शक, लेखक
२०१९ हुतात्मा हिंदी लेखक, दिग्दर्शक आणि सह निर्माता
२०२२ कोण प्रवीण तांबे हिंदी दिग्दर्शक
२०२२ मुखबीर- द स्टोरी ऑफ अ स्पाय हिंदी दिग्दर्शक, लेखक
२०२४ फिर आयी हसीन दिलरुबा हिंदी दिग्दर्शक

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nagrik Movie Review". ISSN 0971-8257.
  2. ^ "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/". Loksatta. 2015-05-09. 2024-09-15 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ "'फिर आई हसीन दिलरुबा' के डायरेक्टर जयप्रद देसाई- 3 महीने व्हील चेयर पर रहा, मौत के मुंह से लौटा". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2024-09-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/". Loksatta. 2015-05-10. 2024-09-15 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  5. ^ "'नागरिक'ला 'प्रभात चित्रपट पुरस्कार 2015'ची तब्बल 14 नामांकने !". Divya Marathi.
  6. ^ "After the stupendous success of Hutatma season 1, ZEE5 announces season 2". Zee News (इंग्रजी भाषेत). 2024-09-15 रोजी पाहिले.
  7. ^ "Hutatma, a web series on the creation of Maharashtra". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-04-26. 2024-09-15 रोजी पाहिले.
  8. ^ "कौन प्रविण तांबे". Maharashtra Times. 2024-09-15 रोजी पाहिले.
  9. ^ Developer, Web. "Shreyas Talpade`s 'Kaun Pravin Tambe' nominated for Filmfare Awards". Mid-day. 2024-09-15 रोजी पाहिले.
  10. ^ "वेब सीरीज रिव्‍यू: मुखबिर- द स्‍टोरी ऑफ ए स्‍पाई, सीजन-1". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2024-09-15 रोजी पाहिले.
  11. ^ Kumar, Anushka Halve,Sharanya (2023-08-05). "Complete List of Winners: The Screenwriters Association Awards 2023". www.filmcompanion.in (इंग्रजी भाषेत). 2024-09-15 रोजी पाहिले.
  12. ^ "'Phir Aayi Hasseen Dillruba' director Jayprad Desai: 'Celebrating the flawed, not defending them'". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2024-08-18. 2024-09-15 रोजी पाहिले.