कन्फ्युशियनवाद
कन्फ्युशियनवाद, ज्याला रुइझम किंवा रु क्लासिकिझम म्हणूनही ओळखले जाते,[१] ही प्राचीन चीनमध्ये निर्माण झालेली विचारधारा आणि वर्तनाची एक प्रणाली आहे. परंपरा, तत्त्वज्ञान, धर्म, मानवतावादी किंवा तर्कवादी धर्म, शासनाचा एक मार्ग किंवा फक्त जीवनपद्धती असे विविध वर्णन कन्फ्युशियनवादाचे केले जाते.[२] कन्फ्यूशियनवाद हा चिनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशियस (इ.स.पू. ५५१-४७९) यांच्या शिकवणीतून पुढे "हंड्रेड स्कूल ऑफ थॉट" म्हणून विकसित झाला. बौद्ध धर्म, ताओ धर्म आणि कन्फ्यूशियनवाद हे चीनमधील तीन सर्वात प्रमुख धर्म किंवा विचारप्रवाह आहेत. तथापि चीन सरकार कन्फ्यूशियनवादाला विचारधारा मानते, धर्म मानत नाही.
तांग राजवंश (६१८-९०७) दरम्यान कन्फ्यूशियन पुनरुज्जीवन सुरू झाले. तांगच्या उत्तरार्धात, बौद्ध धर्म आणि ताओवादाच्या प्रतिसादात कन्फ्यूशिअनवाद विकसित झाला आणि "नव-कन्फ्यूशियझम" म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली.
संदर्भ
[संपादन]- ^ Nylan, Michael (1 October 2008). The Five "Confucian" Classics (इंग्रजी भाषेत). Yale University Press. p. 23. ISBN 978-0-300-13033-1. 12 March 2022 रोजी पाहिले.
- ^ Yao 2000
बाह्य दुवे
[संपादन]- Stanford Encyclopedia of Philosophy Entry: Confucius
- Interfaith Online: Confucianism
- Confucian Documents at the Internet Sacred Texts Archive.
- Oriental Philosophy, "Topic:Confucianism"