एप्रिल ३०
Appearance
एप्रिल ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२० वा किंवा लीप वर्षात १२१ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४९२ - स्पेनची राणी इसाबेलाने क्रिस्तोबाल कोलंबोला भारताला जाण्याचा समुद्री रस्ता शोधण्यासाठी मुभा दिली.
सतरावे शतक
[संपादन]- १६५७ - शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
अठरावे शतक
[संपादन]- १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्षपदी निवड.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
- १९४५ : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव अटळ झाल्यावर क्रूरकर्मा हिटलरची आत्महत्या. सोव्हिएत सैनिकांनी बर्लिन येथील जर्मन संसदेवर (राइशस्टॅग) विजयी झेंडा फडकावला.
- १९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.
- १९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- १९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
- १९९३ : टेनिस खेळाडू मोनिका सेलेसवर चाकूहल्ला.
- १९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
- १९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्घाटन झाले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००८ - रशियाच्या इकॅटेरिनबर्ग शहराजवळ सापडलेल्या अस्थि झारेविच अलेक्सेई निकोलाएविच आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
- २००९ - क्रायस्लर कंपनीने दिवाळे काढले.
जन्म
[संपादन]- १६६२ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
- १७७७ - कार्ल फ्रीडरीश गाउस, जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.
- १८०३ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
- १८७० - धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक.
- १८९३ - होआकिम फॉन रिबेनट्रॉप, नाझी अधिकारी.
- १९०८ - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- १९०९ - माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९०९ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी.
- १९१० - श्रीरंगम श्रीनिवास ऊर्फ श्री श्री राव, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार.
- १९२६ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
- १९३३ - विली नेल्सन, अमेरिकन संगीतकार.
- १९४६ - कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनचा राजा.
- १९४९ - ॲंतोनियो गुतेरेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९५९ - स्टीवन हार्पर, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९८७ - रोहित शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ६५ - लुकान, रोमन कवी.
- १०३० - मोहंमद गझनी, गझनवी साम्राज्याचा शासक.
- १०६३ - रेन्झॉॅंग, चीनी सम्राट.
- १५६४ - पोप मार्सेलस दुसरा.
- १८७८ - स्वामीमहाराज अक्कलकोट, साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी.
- १८८३ - एदुआर माने, चित्रकार.
- १९०० - केसी जोन्स, अमेरिकन रेल्वे अभियंता.
- १९१३ - मोरो केशव दामले, मराठी व्याकरणकार आणि निबंधकार.
- १९४५ - एडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.
- १९४५ - एव्हा ब्रॉन, अॅडॉल्फ हिटलरची सोबतीण.
- १९९५ - मॉॅंग मॉॅंग खा, म्यानमारचा पंतप्रधान.
- २००१ - श्रीपाद अच्युत दाभोळकर प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ.
- २००३ - वसंत पोतदार, मराठी साहित्यिक
- २०१२ - अचला सचदेव, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २०१४ - खालिद चौधरी, भारतीय चित्रकार आणि चित्रपट नेपथ्य संकल्पक.
- २०२० - ऋषी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- वालपर्जिस दिन - जर्मनी, मध्य व पश्चिम युरोप.
- राणीचा दिवस - नेदरलँड्स.
- मुक्ती दिन - व्हियेतनाम.
- बाल दिन - मेक्सिको.
- बालकामगार विरोधी दिन
- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर एप्रिल ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - (एप्रिल महिना)