आरती अगरवाल
जन्म |
५ मार्च, १९८४[१][२] न्यू जर्सी[३] |
---|---|
मृत्यू | ६ जून, २०१५ (वय ३१) |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | २००१ - २०१५ |
भाषा | गुजराती |
पती | [४] |
आरती अगरवाल (५ मार्च, १९८४ - ६ जून, २०१५) ही एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री होती जिने प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम केले.[५]
वैयक्तिक आयुष्य आणि कारकीर्द
[संपादन]अग्रवाल चा जन्म ५ मार्च १९८५ रोजी न्यू जर्सी येथे गुजराती कुटुंबात झाला.[६] तिची धाकटी बहीण अदिती अग्रवाल ही देखील तेलगू चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे.[७] वयाच्या १४ व्या वर्षी, अभिनेता सुनील शेट्टीने तिला प्रथम पाहिले आणि फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया येथे तिला स्टेजवर नृत्य करण्यासाठी आमंत्रित केले. या कार्यक्रमानंतर, शेट्टीने तिच्या वडिलांना तिला बॉलिवूडमध्ये अभिनय करण्यास प्रवृत्त केले. वयाच्या १६व्या वर्षी तिने हिंदी चित्रपट पागलपन मधून पदार्पण केले.[८]
अग्रवालने अभिनेते व्यंकटेश सोबत 'नुव्वु नाकू नचाव' या तेलगू चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. याशिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते चिरंजीवी, नंदामुरी बालकृष्ण, नागार्जुन, व्यंकटेश, प्रभास, महेश बाबू, रवी तेजा, आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत देखील काम केले.[३]
२००५ मध्ये, प्रसार माध्यमात अशी बातमी आली की अग्रवालने आपल्या एका सहकलाकाराशी प्रेमसंबंध बिघडल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.[९][१][१०]२००६ मध्ये, घरी झालेल्या अपघातानंतर, तिला अपोलो हॉस्पिटल, ज्युबली हिल्स, हैदराबाद येथे डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले.[५][११][१२]
२००७ मध्ये अग्रवाल ने एका सॉफ्टवेर इंजिनिअरशी लग्न केले. परंतु २००९ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.[४]
मृत्यू
[संपादन]६ जून २०१५ रोजी, अग्रवाल यांना अटलांटिक सिटी, न्यू जर्सी येथील अटलांटिक केर रीजनल मेडिकल सेंटर येथे दाखल केल्या नंतर तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.[१३] अग्रवाल वर सहा आठवड्यांपूर्वी लिपोसक्शन शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे तिला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता.[१४][१५][१६][१७] तिच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले.[१८][१९] ती तिच्या आईवडिलांसोबत एग हार्बर टाउनशिपमध्ये राहात होती.[२०][२१]
चित्रपट सूची
[संपादन]वर्ष | चित्रपट | भूमिका | नोंदी |
---|---|---|---|
२००१ | पागलपन | रोमा पिंटो | हिंदी चित्रपट |
नुववू नकाकु नाचव | नंदिनी | तेलुगू चित्रपट | |
२००२ | नुवु लेका नेणू लेनू | कृष्णा वेणी | नामांकित - सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीसाठी फिल्मफेर पुरस्कार |
अल्लारी रामुडू | मैथिली | तेलुगू चित्रपट | |
इंद्र | स्नेहलता रेड्डी | सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी CineMAA पुरस्कार | |
नी स्नेहम | अमृता | तेलुगू चित्रपट | |
बॉबी | भाग्यमती | तेलुगू चित्रपट | |
२००३ | पलनाटी ब्राह्मणायुडू | श्रुती | तेलुगू चित्रपट |
वसंतम | नंदिनी | तेलुगू चित्रपट | |
विदे | मंगथायारू | तेलुगू चित्रपट | |
२००४ | नेणुन्नू | श्रुती | तेलुगू चित्रपट |
अडावी रामुडू | मधुलता | तेलुगू चित्रपट | |
कोडुकू | विशेष अतिथी | ||
२००५ | संक्रांती | पद्मा | तेलुगू चित्रपट |
सोग्गडू | स्वाती | तेलुगू चित्रपट | |
नरसिंहुडू | स्वतः | विशेष अतिथी | |
छत्रपती | स्वतः | विशेष अतिथी | |
बांबरा कन्नले | पूजा | तामिळ चित्रपट | |
२००६ | आंदळा रामुडू | राधा | नामांकित - सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीसाठी फिल्मफेर पुरस्कार |
२००८ | गोरिन्टाकू | नंदिनी | तेलुगू चित्रपट |
दिपावली | अज्ञात | ||
२००९ | पोसणी सज्जन | नीरजा | तेलुगू चित्रपट |
२०१० | ताज महाल | मैसंमा | विशेष उपस्थिती |
२०१० | ब्रह्मलोकम् ते यमलोकम् मार्गे भुलोकम् | रंभा | तेलुगू चित्रपट |
२०११ | वनकन्या आश्चर्य वीरुडु | वना कन्या | तेलुगू चित्रपट |
२०१५ | रणम २ | अज्ञात | |
२०१६ | आमे एवारू | प्रोफेसर प्रवल्लिका | मरणोत्तर प्रसारित |
संदर्भ
[संपादन]- ^ a b Chandni Prashar (June 8, 2015). "Aarthi Agarwal, A Brief Candle in the Wind". ndtv.com.
- ^ Mishra, Rashmi (June 7, 2015). "Aarthi Agarwal dies after 'failed liposuction' surgery: 5 Things to know about dead Tollywood Actress". India.com. September 9, 2016 रोजी पाहिले.
- ^ a b "Telugu actress Aarthi Agarwal passes away at 31". The Indian Express. June 6, 2015. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ a b "Aarthi Agarwal divorces Tasval Kumar". The New Indian Express. 2016-05-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ a b Ma, Myles (June 7, 2015). "Tollywood actress was attempting comeback before her death". NJ Advance Media. June 7, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Tollywood actor Aarthi dies at 31 in US". Deccan Herald. Hyderabad. June 7, 2015. May 18, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 17, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Aditi Agarwal". द टाइम्स ऑफ इंडिया. June 12, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Aarthi Agarwal Dies in New Jersey; Celebrities Condole her Untimely Death". International Business Times. June 6, 2015. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Actress Aarti Agarwal attempts suicide?". द हिंदू. March 24, 2005. October 22, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Telugu actress Aarthi Agarwal dies at 31, a month after liposuction surgery". The Indian Express. June 9, 2015.
- ^ "Actress Aarti in coma after mystery fall". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ "I stopped caring about rumours: Aarti Agarwal". Deccan Chronicle. June 7, 2015.
- ^ "Indian actress Aarthi Agarwal dies in N.J. hospital". The Star-Ledger. June 6, 2015. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Tollywood Mourns The Death Of Aarti Agarwal". greatandhra.com. June 8, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 6, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Telugu Actor Aarthi Agarwal Dies at 31". NDTVMovies.com. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ "జయమాలిని కోసం మరో 3 కేజీలు తగ్గే ప్రయత్నంలో." (तेलगू भाषेत). Andhra Jyothy. 2015-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 6, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Liposuction that kills". Aarti Agarwal's death highlights the dark side of Tollywood. June 8, 2015.
- ^ "Aarthi Agarwal's Father, Manager, Surgeon Speak About her Liposuction, Death". International Business Times. June 7, 2015.
- ^ "31 વર્ષની ઉંમરે અભિનેત્રીનું થયું નિધન, શુક્રવારે રીલિઝ થઈ અંતિમ ફિલ્મ". Divya Bhaskar.com. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Telugu actress Aarthi Aggarwal passes away at 31". Deccan Chronicle. June 6, 2015. June 8, 2015 रोजी पाहिले.
- ^ Wheatstone, Richard. "Bollywood actress Aarthi Agarwal dead after 'liposuction surgery gone wrong'", Daily Mirror, June 8, 2015. Retrieved June 8, 2015. "But she had seen her career fade in recent years and was living with her parents in her home town of Egg Harbor Township."
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आरती अगरवाल चे पान (इंग्लिश मजकूर)