Jump to content

अंकीय संदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंकीय पद्धत

अंकीय संदेशवहन (अन्य नामभेद: अंकिकी संदेशवहन ; इंग्लिश: Digital signal, डिजिटल सिग्नल ;) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनातील आधुनिक पद्धत आहे. अनुरूप संदेशवहन पद्धतीमध्ये पाठवायचा संदेश वाहक (carrier) सूक्ष्म लहरींवर आरूढ करून पाठवला जातो. या सूक्ष्म वाहक लहरी जेव्हा प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यांत कधीकधी नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे बदल होतात. त्यामुळे संदेशग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मूळ संदेशपेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. या दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मूळ संदेशाचे नायक्विस्ट सिद्धान्ताप्रमाणे ठरावीक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात. हे मूल्यांक द्विमान पद्धतीत असतात. ग्राहक हा अशा रितीने प्रक्षेपित केलेला संदेश ग्रहण करतो आणि मूळ संदेशाच्या मूल्यांकाधारे पूर्ववत बनवतो. अशा प्रकारे, अंकिकी संदेशवहनात मूळ संदेश जसाच्या तसा न पाठविता, केवळ संदेशाच्या ठरावीक अंतराच्या नमुन्यांचे मूल्यांक प्रक्षेपित केल्यामुळे मूळ संदेशाचा दर्जा नायक्विस्ट सिद्धान्तामुळे जसाच्या तसा राखला जातो. ठळक मजकूर