Jump to content

सुखदेव थापर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भगतसिंग,सुखदेव,राजगुरू

सुखदेव थापर (पंजाबी: ਸੁਖਦੇਵ ਥਾਪਰ, سُکھدیو تھاپر ) (१५ मे, इ. स. १९०७ - २३ मार्च, इ. स. १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. यांचा इ. स. १९२८ मध्ये जे. पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.

जीवन

[संपादन]

त्यांचा जन्म लुधियाना येथे झाला होता.

क्रांतिकार्यात सहभाग

[संपादन]

सुखदेव हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिक असोसियेशनमधील एक नेता म्हणून त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होता. त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात. भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरुद्ध-अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट होते. सुखदेव यांच्यावर पंडित राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता. सुखदेवने इ. स. १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरुद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता. त्यांचे फाशीपूर्वी महात्मा गांधीना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालींवर प्रकाश टाकते. त्यांच्या कार्यामुळे पंजाबमधील लुधियाना शहारातील त्यांच्या शाळेचे नाव अमर झाले.

शिक्षा आणि फाशी

[संपादन]

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ. स. १९३१ला संध्याकाळी ७.३३ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.

सुखदेव यांच्यावरील पुस्तके

[संपादन]