इ.स. १९८४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९८१ - १९८२ - १९८३ - १९८४ - १९८५ - १९८६ - १९८७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ५ - रिचर्ड स्टॉलमनने ग्नू वर काम सुरू केले.
- फेब्रुवारी ३ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
- फेब्रुवारी ८ - सारायेवोत चौदावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी १३ - युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
- मे ८ - सोवियेत संघाने लॉस एंजेल्समधील तेविसावे ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- मे ८ - डेनिस लॉर्टीने कॅनडातील क्वेबेकप्रांताच्या विधानसभेत गोळ्या चालवल्या. ३ ठार. १३ जखमी.
- मे २३ - बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण.
- जून ५ - अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
- जून ६ - ऑपरेशन ब्लू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
- जुलै १४ - डेव्हिड लॅंग न्यू झीलंडच्या पंतप्रधानपदी.
- जुलै १७ - लॉरें फाबियस फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
- जुलै १८ - सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
- जुलै २५ - सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
- ऑक्टोबर ३१- भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या. त्यांचे पुत्र राजीव गांधी यांचा भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून शपथविधी.
- डिसेंबर २२ - न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गेट्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
जन्म
संपादन- सप्टेंबर ७ - फरवीझ महरूफ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - ऍशली सिम्पसन, अमेरिकन गायिका.
- मे १४ - मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ९ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- मार्च १० - आय.एस. जोहर, हिंदी चित्रपट अभिनेता.
- मार्च २२ - प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक.
- ऑगस्ट १४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
- ऑक्टोबर ३१- इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान