Jump to content

क्वांगचौ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्वांगझू या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
广州市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

वरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, मोती नदीवरील हाईचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहाई मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल
ग्वांगचोऊचे ग्वांगदोंग प्रांतामधील स्थान
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou) is located in चीन
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)चे चीनमधील स्थान

गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य ग्वांगदोंग
स्थापना वर्ष १९१८
महापौर छन च्यान-ह्वा
क्षेत्रफळ ७,४३४.४ चौ. किमी (२,८७०.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३७ फूट (११ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७६,०७,२००
  - घनता १,०२३ /चौ. किमी (२,६५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.gz.gov.cn


ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.

ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2003-12-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • "क्वांगचौ पर्यटन विभागाचे संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2011-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)