Jump to content

अग्नि क्षेपणास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अग्नी (क्षेपणास्त्र) या पानावरून पुनर्निर्देशित)
अग्नि क्षेपणास्त्र
प्रकार मध्यम पल्ल्याचे
राष्ट्र भारत
सेवेचा इतिहास
सेवेत १७/०१/२००१
वापरकर्ते भारतीय लष्कर
उत्पादनाचा इतिहास
उत्पादक संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारत डायनामिक्स (BDL)
एककाची किंमत २५ कोटी (US$५.५५ दशलक्ष) ते ३५ कोटी (US$७.७७ दशलक्ष)[]
तपशील
वजन १२००० किलो
लांबी १५ मीटर
व्यास 1.0 m (Agni-I, Agni-II)
2.0 m (Agni-III)

युद्धाग्र Strategic nuclear (15 KT to 250 KT), conventional HE-unitary, penetration, sub-munitions, incendiary or fuel air explosives

इंजिन Single Stage (Agni-I)
Two-and-half-stage (Agni-II)
Two stage (Agni-III) solid propellant engine
क्रियात्मक
पल्ला
700-800 km (Agni-I)
2,000-3,500 km (Agni-II)
3,500-5,500 km (Agni-III)
5,000 km (Agni-V)
8,000-10,000 km (Agni-VI)
उड्डाणाची उंची > 90 km
गती 5-6 km/s (Agni-II)[]
दिशादर्शक
प्रणाली
Ring Laser Gyro- INS (Inertial Navigation System), optionally augmented by GPS terminal guidance with possible radar scene correlation
क्षेपण
मंच
8 x 8 Tatra TELAR (Transporter erector launcher) Rail Mobile Launcher
अग्नि-२ क्षेपणास्त्र

अग्नि क्षेपणास्त्र हे भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न चालु आहे. हा संस्कृत मूळ असलेला शब्द आहे.

इतिहास

[संपादन]

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

सातशे किलोमीटरचा पल्ला असलेले (१९ एप्रिल २०१२)

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेले (१५ सप्टेंबर २०१३)

  • भारतानं अग्नि-२ या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली
  • ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली आहे.
  • इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स ४ मधून मोबाइल लॉंचरच्या माध्यमातून अग्नि-२ ची चाचणी घेण्यात आली.
  • अग्नि-२ क्षेपणास्त्र २० मीटर लांबीचे असून त्याचे वजन १७ टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नि-२ चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे.
  • भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे.

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले (३१ जानेवारी २०१५)

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ४००० किलोमीटरचा पल्ला असलेले (९ नोव्हेंबर २०१५)

आंतरखंडीय क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला असलेले (२६ डिसेंबर २०१६ला चाचणी यशस्वी) या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनी पेक्षा २४ पटीने अधिक आहे.

आंतरखंडिय क्षेपणास्त्र ६००० ते १०००० किलोमीटर पल्ला असलेले विकसित केले जात आहे.

अग्नि क्षेपणास्त्राची कक्षा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Technical tune to Agni test before talks". The Telegraph. 2007-12-13 रोजी पाहिले.
  2. ^ Vishwakarma, Arun (2007-07-01). "Indian Long Range Strategic Missiles" (PDF). Lancer Publishers and Distributors. 2007-11-29 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2007-12-13 रोजी पाहिले.