Jump to content

हिंद-आर्य भाषासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
दक्षिण आशियाच्या नकाशावर हिंद-आर्य भाषासमूह

हिंद-आर्य भाषासमूह हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी कुळामधील एक भाषासमूह आहे. ह्या समूहामध्ये मुख्यत: भारत देशाच्या उत्तर. पूर्व व पश्चिम भागांमधील भाषांचा समावेश होतो (दक्षिण भारतात प्रामुख्याने द्रविडी भाषांचा वापर होतो). सुमारे ९० कोटी लोक ह्या भाषा वापरतात.

इतिहास

वेदिक संस्कृत ही हिंद-आर्य भाषासमूहाची पालक भाषा भारतीय द्वीपकल्पामध्ये इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५०० ह्या काळादरम्यान अस्तित्वात होती. वेदांची भाषा असलेल्या वेदिक स्ंस्कृतमध्येच हिंदू धर्माची मुळे सापडतात. इ.स. पूर्वच्या चौथ्या शतकामध्ये पाणिनि ह्या संस्कृत पंडिताने अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरण ठरवणारा ग्रंथ लिहिला. संस्कृत ही केवळ पंडित व विद्वानांची भाषा असल्यामुळे सर्वसाधारण भारतीय जनतेद्वारे प्राकृत ह्या भ्रष्ट बोलीभाषांचा वापर सुरू झाला. अर्ध-मगधी, पाली ह्या सर्वात जुन्या प्राकृत भाषा मानल्या जातात.मध्य युगातील अनेक भारतीय बोलीभाषांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी अपभ्रंश हा शब्द वापरला जातो.

१३ ते १६व्या शतकांदरम्यान घडलेल्या भारतावरील अनेक मुस्लिम आक्रमणांमुळे हिंद-आर्य भाषांना वेगळी दिशा मिळाली. मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखालील उत्तर भारतामध्ये फारसी भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. ह्यामधून हिंदुस्तानीचा उगम झाला. हिंदुस्तानीवर संस्कृत व फारसी ह्या दोन्ही भाषांचा प्रभाव पडला आहे.

यादी

उत्तर क्षेत्र

वायव्य क्षेत्र

पश्चिम क्षेत्र

मध्य क्षेत्र

पूर्व क्षेत्र

दक्षिण क्षेत्र

बाह्य दुवे