गुरुपौर्णिमा
हे पान निर्माणाधीन आहे हा एक नवीन विकिपीडिया लेख आहे, जो निरंतर संपादनांनी निर्माण केल्या जात आहे.जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल, किंवा इतर काही शंका असतील तर कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे निर्माणकाशी त्याबद्दल आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या निर्माणकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये. धन्यवाद.
|
गुरु पौर्णिमा हा एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते.[१]गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.गुरु पूजन करण्यासाठी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते.
गुरु संकल्पना
वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.
व्यास महात्म्य
महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात कारण त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली. त्यांचा जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दवैपायन असे संबोधिले जाते.[२] व्यास : उच्छिष्टं जगत् सर्वम् || असे म्हंटले जाते कारण त्यांनी वेदांची रचना केलेली आहे. त्यांनी स्पर्श केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरु स्थानी मान दिला जातो.[३]
बौद्ध धर्मातील महत्व
आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धाने सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस गुरु पौर्णिमेचा होता असे मानले जाते त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे.[४]
अन्य
व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.[५][६] शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[७]
संदर्भ
- ^ "Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि पूजा पद्धत". Maharashtra Times. 2024-07-17 रोजी पाहिले.
- ^ "कृष्ण द्वैपायन - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". m.bharatdiscovery.org. 2024-07-17 रोजी पाहिले.
- ^ Hari, Sri (2019-03-02). वेदव्यास: Vedavyasa (हिंदी भाषेत). Bharatha Samskruthi Prakashana. ISBN 978-93-89020-39-7.
- ^ Kumar, S. Maharastriya Sana Ani Utsava. Booksclinic Publishing. ISBN 978-93-5535-897-4.
- ^ CHARRAN, SWAMI RAM (2012). Guru Initiation Puja Handbook (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781105274947.
- ^ Knapp, Stephen (2006-06-05). The Power of the Dharma: An Introduction to Hinduism and Vedic Culture (इंग्रजी भाषेत). iUniverse. ISBN 9780595837489.
- ^ "गुरुपौर्णिमा". २७ जुलै २०१८.