Jump to content

कठोपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उपनिषद साहित्यातील एक महत्वाचे उपनिषद. यामध्ये वाजश्रवा ऋषींचा पुत्र नचिकेत आणि यम यांच्यामध्ये घडलेला संवाद येतो.हे उपनिषद तत्वज्ञानप्रधान आहे.

आशय

या उपनिषदातील महत्वाचे मुद्दे म्हणजे देहरूपी रथाचे वर्णन,मृत्यू आणि स्वप्न यांचे खरे स्वरूप जाणून घेतले असता ब्रह्मज्ञान होते,तसेच आत्म्याचे अमरत्व,स्वर्ग इ.लोकांमध्ये येणारे अनुभव,ब्रह्मलोकातील आत्म्याचा अनुभव.ज्या मार्गाने कल्याण होऊ शकते तो मार्ग म्हणजे श्रेयस.आणि संसारातील भोग्य पदार्थांचा जो मार्ग तो प्रेयस होय.