अलास्का एरलाइन्स
| ||||
स्थापना | इ.स. १९३२ (मॅकगी एअरवेज नावाने)[१] | |||
---|---|---|---|---|
हब | ||||
फ्रिक्वेंट फ्लायर | मायलेज प्लान | |||
विमान संख्या | १४७ | |||
पालक कंपनी | अलास्का एअर ग्रूप | |||
मुख्यालय | सिॲटल | |||
प्रमुख व्यक्ती | ब्रॅड टिल्डन, मुख्याधिकारी[३] | |||
संकेतस्थळ | अलास्काएअर.कॉम |
अलास्का एअरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. वॉशिंग्टन राज्याच्या सिॲटल शहरात मुख्यालय असलेली ही कंपनी अलास्का एअर ग्रूपची उपकंपनी आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील १००पेक्षा अधिक शहरांना सेवा पुरवणारी ही विमान कंपनी २००४ सालापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.[४]
अलास्का एअरलाइन्स विमान कंपनीची स्थापना १९३२मध्ये मॅकगी एअरवेज या नावाने झाली त्यावेळी ही कंपनी मुख्यत्वे अँकरेजपासून विमानसेवा पुरवायची.
या कंपनीचे हब सियाटल-ताकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच तिचे लॉस एंजल्स, पोर्टलॅंड, सॅन फ्रान्सिस्को, अँकोराज येथे दुय्यम दर्जाचे हब आहेत.[५] जरी अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून ते मोठ्या हब्स ला सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात, अन्य कुठल्याही कंपनीपेक्षा जास्त वाहतूक करते.[६]
अलास्का एअरलाईन ३ सगळ्यात मोठ्या विमान संघटनांपैकी कुठल्याही संघटनेची सदस्य नाहीये. परंतु तिचे वन वर्ल्ड च्या काही सदस्य कंपन्या, जसे अमेरिकन एअरलाईन्स, ब्रिटीश एअरवेज आणि एल.ए.टी.ए.एम. चिले, आणि स्काय टीमच्या काही सदस्य कंपन्या एअर फ्रांस, के.एल.एम. आणि कोरियन एअर सोबत कोड शेअर्स आहेत. डेल्टा जिचे १९ डिसेंबर २०१७ पर्यंत अल्स्का एअरलाईन सोबत कोड शेअर्स होते, ती आता सियाटल-ताकोमा मध्ये अलास्काची सगळ्यात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी आहे. अलास्का एअर ग्रुप २०११ पासून डाऊ-जोन्स ट्रान्सपोर्टेशन एवरेजमध्ये हिस्सेदार आहे.
नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एअरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या पायलटच्या ग्रुपमध्ये १,५५० पायलटचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाईट अटेंडेंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.
मे २००५ पासून कंपनीचे बॅगेज हँडलिंगचे काम मेंझिस एविएशनला देण्यात आलेले आहे. यामुळे कंपनीचे जवळपास १३ मिलियन अमेरिकन डॉलर्सची बचत झाली.[७]
अलास्का एअरलाईनची अमेरिकेच्या काही भागात माल वाहतुकीची सेवा आहे. सर्वात लांबची सेवा त्यांची अमेरिकेच्या पश्चिमी किनार्यापर्यंत आहे. अलास्काचे मालवाहतुकीचे मुख्य लक्ष्य अलास्का आणि त्याचे उत्तरपश्चिमी शेजारी राज्यांवर आहे. अलास्काच्या दक्षिणेला प्रामुख्याने ताज्या अलास्कन समुद्री खाद्द्याची वाहतूक तर उत्तरेला प्रामुख्याने टपालाची वाहतूक होते.
अलास्काचे हवाई जाळे अमेरिका, कॅनडा, कोस्टा रिका आणि मेक्सिकोच्या ९२ पेक्षा जास्त शहरात पसरलेले आहे. काही राज्यांमध्ये नामधारी सेवा चालविली जाते, ज्यामध्ये अँकोराज, अँडाक, बॅरो, कॉर्डोव, फैरबँक्स, जूनो, केटचीकं, कॉडीयेक, कोटझेबू, किंग साल्मोन, नोम, पृधो बे आणि सिट्का यांचा समावेश ज्यापैकी काही ठिकाणी तर रस्तामार्गाने जाता येत नाही. १९९१ मध्ये सोवियत युनियनच्या विभाजनानंतर कंपनीने रशियाच्या पूर्वी क्षेत्रात सेवा देण्यास प्रारंभ केला.[८] परंतु १९९८च्या रशियन वित्तीय संकटानंतर त्यांनी सेवा बंद केली.
ऐतिहासिकरित्या अलास्का अमेरिकेच्या पश्चिमी किनारपट्टीवरील तसेच अलास्कापर्यंत आणि अलास्काअंतर्गत सेवा पुरविणारी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी आहे जिची सियाटल, पोर्टलॅंड, सॅन दिएगो मध्ये मजबूत स्थिती आहे. फर्स्ट क्लास मध्ये प्रवाशांना मोफत जेवण किंवा हलका नाश्ता देण्यात येतो. २००६ मध्ये कंपनीने ‘नॉर्थर्न बाइट्स’ नावाची बाय ऑन बोर्ड योजना सुरु केली जी अडीच तासांच्या वर प्रवास असलेल्या जवळपास सगळ्याच विमानांमध्ये सुरु करण्यात आली होती.[९]
अलास्का एअरलाईनला, वर्ल्ड एअरलाईन एन्टरटेनमेंट असोशिएशन द्वारा प्रवाशांना विमानात ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारी पहिली कंपनी असल्याचे प्रमाणित करण्यात आले.[१०] अलास्काने ऑक्टोबर २००३मध्ये हार्ड ड्राईव असलेला, मागणीप्रमाणे ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारा पोर्टेबल उपकरण बसविले
अलास्का एअरलाईन्सला मार्च २०१४ मध्ये ‘एअरलाईन आय.एफ.इ. सर्विस ऑफ द इअर’ पुरस्कार मिळाला.[११]
२००९मध्ये अलास्का एअरलाईन्सने विमानात वाय-फाय सुविधेची चाचणी सुरु केली.[१२] ऑक्टोबर २०१० पासून हळूहळू सगळ्याच विमानात हि सुविधा देण्यात आली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Norwood, Tom; Wegg, John (2002). (3rd ed.). Sandpoint, ID. ISBN 0-9653993-8-9 http://www.airwaysnews.com. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Alaska Airline Fact Sheet
- ^ Associates Press;Thu, February 16, 2012 (February 16, 2012). http://news.yahoo.com/alaska-air-ceo-retiring-insider-replace-him-133814904.html. May 17, 2012 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ . May 14, 2014 http://online.wsj.com/article/PR-CO-20140514-908358.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.cleartrip.com/flight-booking/alaska-airlines.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://old.seattletimes.com/html/businesstechnology/2002274683_alaska14.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.nytimes.com/1997/03/30/travel/alaska-airlines-opens-russia-s-wild-east.html?src=pm. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.alaskaair.com/content/travel-info/flight-experience/main-cabin/food-and-drink.aspx#fresh. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://web.archive.org/web/20080829171146/http:/www.waea.org/ife.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://newsroom.alaskaair.com/awards. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://splash.alaskasworld.com/Newsroom/ASNews/ASstories/AS_20090226_050547.asp. Missing or empty
|title=
(सहाय्य)