Jump to content

रिचर्ड वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉर्ड वेलस्ली

लॉर्ड वेलस्ली (जन्म: २० जून, इ.स. १७६० मृत्यू: २६ सप्टेंबर, इ.स. १८४२) याचे पूर्ण नाव रिचर्ड कॉली वेलस्ली असे होते.रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला. तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटीश सत्तेची पाळमुळं आणखी घट्ट केली.