"सूरदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mitoderohne (चर्चा | योगदान) No edit summary |
Mitoderohne (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
हेसुध्दा पहा: |
हेसुध्दा पहा: |
||
* [ |
* [https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand19/index.php/component/content/article?id=10633 मराठी विश्वकोशातील सूरदासांचे चरित्र] |
२३:१०, २२ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
सूरदास (जन्म सुमारे १४७८, मृत्यू सुमारे १५६३) हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहीणारे एक भक्तकवी होते. त्यांच्या “सूरसागर” या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत.
सूरदासांचा जन्म दिल्लीजवळच्या सीही गावात एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले. वल्लभाचार्यांनी त्यांना श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात लगेचच प्रसिध्द झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून तानसेनाच्या मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा फारसी अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यीक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते. आधुनिक काळात सूरसागराचे प्रकाशन वाराणसीच्या नागरी प्रचारिणी सभेने १९५० मध्ये केले. २०१५ मध्ये सूरसागराचे इंग्रजी भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.
सूरसागराशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.
हेसुध्दा पहा: