२००९ लोकसभा निवडणुका

भारतातील सार्वत्रिक निवडणूक

भारताच्या १५ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका एप्रिल १६, एप्रिल २२, एप्रिल २३, एप्रिल ३०, मे ७ आणि मे १३ अशा ५ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी मे १६ इ.स. २००९ रोजी करण्यात येणार आहे.[] या निवडणुकांत अंदाजे ७१ कोटी ४ लाख मतदार आपला कौल देतील. मागील निवडणुकांपेक्षा ही संख्या ४ कोटी ३० लाखांनी जास्त आहे. या निवडणुकीसाठी २००९ च्या अंदाजपत्रकात ११ अब्ज २० कोटी रुपयांची (१ कोटी ८० लाख युरो) तरतूद करण्यात आलेली आहे.[] या निवडणुकी बरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये त्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेण्यात येतील.

२००९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता मनमोहन सिंग लालकृष्ण आडवाणी
पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष
मागील जागा १४५ १३८
जागांवर विजय २०६ ११६
बदल ६१ २२

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

मनमोहन सिंग

निर्वाचित पंतप्रधान

मनमोहन सिंग

before_party       = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस map =

भारतीय संविधानानुसार पाचवर्षात एकदा लोकसभा निवडणुका घेणे आवश्यक आहे. १४व्या लोकसभेची मुदत जून १, २००९ रोजी संपेल. १५वी लोकसभा त्याआधी अस्तित्वात येईल. या निवडणुका भारतीय निवडणुक आयोग घेते.

निकाल आढावा

संपादन

२००९ एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा
संदर्भ: निवडणुक आयोग Archived 2009-05-16 at the Wayback Machine. आयबीएन लाइव Archived 2009-05-19 at the Wayback Machine.

आघाडी पक्ष जिंकलेल्या जागा बदल
यु.पी.ए.
जागा: 263
बदल: +८०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २०६ +६१
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस १९ +१७
द्रविड मुनेत्र कळघम १८ +२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
नॅशनल कॉन्फरन्स पक्ष +२
झारखंड मुक्ती मोर्चा −३
भारतीय संयुक्त मुस्लिम लीग +१
केरळ काँग्रेस (मणी) +१
ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन
विदुथलै चिरुतैगल कच्ची --
आर.पी.आय. (आठवले) −१
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
Seats: १५९
जागा बदल: −१७
भारतीय जनता पक्ष ११६ −२२
जनता दल (संयुक्त) २० +१२
शिवसेना ११ −१
राष्ट्रीय लोक दल +२
शिरोमणी अकाली दल −४
तेलंगण राष्ट्र समिती −३
आसाम गण परिषद −१
भारतीय राष्ट्रीय लोक दल
तिसरी आघाडी
जागा: ७८
बदल: −२७
डावी आघाडी २४ −२९
बहुजन समाज पक्ष २१ +२
बिजु जनता दल १४ +३
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम +९
तेलुगू देसम पक्ष +१
जनता दल (धर्मनिरपेक्ष) −१
हरियाणा जनहित काँग्रेस +१
पट्टली मक्कल कच्ची −६
चौथी आघाडी
जागा: २६
बदल: -३७
समाजवादी पक्ष २३ −१३
राष्ट्रीय जनता दल −२०
लोक जनशक्ती पक्ष −४
इतर व अपक्ष
जागा: १७
१७
  • नोंद: आघाडीच्या खासदारंच्या संख्येतील बदल हा आघाडीतील सगळ्या पक्षांच्या संख्येतील एकूण बदल आहे.

निवडणुक कार्यक्रम

संपादन

मार्च २ २००९ रोजी भारतीय निवडणुक मुख्यायुक्त एन. गोपालास्वामीने खालील कार्यक्रम जाहीर केला:

टप्प्यांनुसार विस्तारित कार्यक्रम

संपादन
२००९ लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम
घटना टप्पे
पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा
टप्पा २अ टप्पा २ब टप्पा ३अ टप्पा ३ब टप्पा ३क टप्पा ५अ टप्पा ५ब
कार्यक्रम जाहीर सोम,मार्च
कार्यक्रमाची अधिकृत जाहीरात सोम, मार्च २३ शनि, मार्च २८ गुरू, एप्रिल २ शनि, एप्रिल ११ शुक्र, एप्रिल १७
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोम, मार्च ३० शनि, एप्रिल ४ गुरू, एप्रिल ९ शनि, एप्रिल १८ शुक्र, एप्रिल २४
उमेदवारी अर्जांची तपासणी मंगळ, मार्च ३१ सोम, एप्रिल ६ शनि, एप्रिल ११ शुक्र, एप्रिल १० सोम, एप्रिल २० शनि, एप्रिल २५
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस गुरू, एप्रिल २ बुध, एप्रिल ८ सोम, एप्रिल १३ बुध, एप्रिल १५ सोम, एप्रिल १३ बुध, एप्रिल २२ सोम, एप्रिल २७ मंगळ, एप्रिल २८
निवडणुक गुरू, एप्रिल १६ बुध, एप्रिल २२ गुरू, एप्रिल २३ गुरू, एप्रिल ३० गुरू, मे ७ बुध, मे १३
मतमोजणी शनि, मे १६
निवडणुक प्रकियेचा शेवटचा दिवस गुरू, मे २८
राज्ये व केंद्रशासित प्रदेश १७ १२
लोकसभा मतदारसंघ १२४ १४० ७७ २९ ८५ ७२ १४
Source:[]

निवडणुक वेळापत्रक

संपादन
लोकसभा निवडणुक २००९ चरण
चरण राज्य व केंद्रशासीत प्रदेश संख्या संसदीय क्षेत्र संख्या निवडणुक तारीख
१७
(आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, अंदमान आणि निकोबारलक्षद्वीप.)
१२४ एप्रिल १६, २००९, (गुरुवार)
१३
(आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, झारखंड)
१४१ एप्रिल २३, २००९, (गुरुवार)
(एप्रिल २२, २००९, बुधवार फक्त १- अंतः मणिपूर मतदारसंघ)
११
(बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, सिक्किम, दादरा आणि नगर-हवेलीदमण आणि दीव)
१०७ एप्रिल ३०, २००९, (गुरुवार)

(बिहार, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालदिल्ली)
८५ मे ७, २००९, (गुरुवार)

(हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, चंदिगढ, पुडुचेरीउत्तर प्रदेश)
८६ मे १३, २००९, (बुधवार)
 
पंधरावी लोकसभा निवडणुक आराखडा
राज्य व केंद्रशासीत प्रदेश चरण संख्या
चरण संख्या राज्य व केंद्रशासीत प्रदेश
पाच जम्मू आणि काश्मीरउत्तर प्रदेश
तीन महाराष्ट्रपश्चिम बंगाल
दोन आंध्र प्रदेश, आसाम, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशापंजाब
एक उर्वरीत १५ राज्ये व ७ केंद्रशासीत प्रदेश

[] []

प्रमुख उमेदवार

संपादन

पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार

संपादन

भारतीय लोकशाहीत पंतप्रधानपदासाठी थेट निवडणुक नसते तर निवडलेले संसदसदस्य पंतप्रधान निवडतात. तरीही प्रमुख पक्षांनी जर त्यांना बहुमत मिळाले तर पंतप्रधानपदी कोण असेल याची जाहीतार केली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधीच्या वक्तव्यानुसार यु.पी.ए.कडून सद्य पंतप्रधान मनमोहनसिंग पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी उमेदवार असतील.[] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता शरद पवारने आपणही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे विधान केले आहे.[] यानंतर मनमोहनसिंग यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली[] व त्यामुळे पुढील पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल नव्याने अटकळी सुरू झाल्या आहेत. याला खीळ घालण्यासाठी फेब्रुवारी ६, २००९ रोजी सोनिया गांधीने आपल्या लेखात मनमोहनसिंगच यु.पी.ए.चे पंतप्रधान उमेदवार असल्याचे प्रतिपादन केले.[]

संसदेतील मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाने डिसेंबर ११, २००७ रोजी जाहीर केले की लालकृष्ण अडवाणी त्यांचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार असतील.[] जानेवारी २३, २००८ रोजी अडवाणींना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली.[१०]. रा.लो.आ.मधील इतर पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

तिसरी आघाडी

संपादन

कम्युनिस्ट पक्ष व इतर प्रादेशिक राजकीय पक्षांनी वरील दोन आघाड्यांना पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. तथापि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की जर त्या पक्षाला पुरेश्या जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाशी जुळवून घेउन सरकार स्थापण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यास त्यांची तयारी आहे.साचा:Fact. मायावती या आघाडीच्या अधिकृत उमेदवार असण्याचीही शक्यता आहे. मायावतीने पंतप्रधानपद मिळवण्यासाठी कोणाशीही संधान बांधण्याची तयारी दाखवली आहे.[११] इतर कोणीही आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही.

या चाचण्या निवडणुक आयोगाशी संलग्न नसतात.

संस्था तारखा निकाल
स्टार-नील्सन ५-३ - १७-३-२००९ युपीए २५७ (काँग्रेस १४४), एनडीए १८४ (भाजप १३७), इतर ९६[१२]
टाइम्स ऑफ इंडिया मार्च २००९ युपीए २०१ (काँग्रेस १४६), एनडीए १९५ (भाजप १३८), इतर १४७[१३]
सीएनएन-आयबीएन-सीएसडीएस ८-१ - १५-१-२००९ युपीए २१५-२३५, एनडीए १६५-१८५, इतर १२५-१५५[१४]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b "General Elections - 2009" (PDF) (English भाषेत). 2009-03-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Rs 1120 crore allocated for Lok Sabha polls
  3. ^ भारतीय निवडणुक आयुक्त संकेतस्थळ
  4. ^ टाईम्स ऑफ इंडिया
  5. ^ Manmohan PM candidate of the Congress: Sonia
  6. ^ "Pawar won't give up on PM race". 2009-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-24 रोजी पाहिले.
  7. ^ "Prime Minister Manmohan Singh's bypass surgery update". 2009-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-24 रोजी पाहिले.
  8. ^ "Sonia does it again, picks Manmohan for PM job". 2009-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-24 रोजी पाहिले.
  9. ^ India party declares PM candidate, BBC News Online, 11 December 2007
  10. ^ NDA endorses Advani as its prime ministerial candidate Archived 2009-06-30 at the Wayback Machine., द हिंदू, 23 January 2008
  11. ^ Mayawati may rock Third Front Archived 2009-02-11 at the Wayback Machine..
  12. ^ "संग्रहित प्रत". 2009-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-24 रोजी पाहिले.
  13. ^ http://timesofindia.indiatimes.com/Lok-Sabha-polls-UPA-ahead-but-only-just/articleshow/4231179.cms
  14. ^ "संग्रहित प्रत". 2009-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-24 रोजी पाहिले.