जानेवारी १३
दिनांक
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३ वा किंवा लीप वर्षात १३ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसोळावे शतक
संपादन- १५५९ - एलिझाबेथ पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
सतरावे शतक
संपादन- १६१० - गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८४२ - काबुलमधुन माघार घेणाऱ्या ब्रिटिश-भारतीय सैन्याच्या १६,५०० सैनिक व असैनिकांपैकी असिस्टंट सर्जन विल्यम ब्रायडन हा एकमेव जिवंत व्यक्ती जलालाबादला पोचला.
- १८४७ - काहुएन्गाचा तहाने कॅलिफोर्नियातील मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपले.
- १८४९ - चिलियनवालाच्या लढाईमध्ये शीखांचा इंग्रजांविरुद्ध विजय.
- १८९३ - हवाईची राणी लिलिउओकालानीला संगीनी राज्यघटना अवैध ठरवण्यापासून अडविण्यासाठी अमेरिकन सैनिक होनोलुलुत उतरले.
- १८९९ - गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
विसावे शतक
संपादन- १९१५ - इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९,८०० ठार.
- १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
- १९४२ - अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात पाठविण्यास सुरुवात केली.
- १९५३ - मार्शल जोसिप ब्रोझ टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी.
- १९५७ - हिराकुद धरणाचे उद्घाटन झाले.
- १९६४ - कोलकाता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
- १९८२ - वॉशिंग्टन डी.सी.च्या विमानतळावरून निघाल्यावर एर फ्लोरिडा फ्लाइट ९० हे बोईंग ७३७ जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
- १९९१ - लिथुएनियाची राजधानी व्हिल्नियस येथील स्वातंत्र्यसैनिकांवर रशियन सैनिकांनी हल्ला केला
- १९९६ - पुणे मुंबई शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
- २००२ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
- २०११ - भारतातील शेवटची पोलियो रुग्ण सापडली.
जन्म
संपादन- १३३४ - हेन्री दुसरा, कॅस्टिलचा राजा.
- १५९६ - यान फान गोयॉॅं, डच चित्रकार.
- १६१० - मरिया आना, ऑस्ट्रियाची राणी
- १८९६ -मनोरमा रानडे, मराठी कवयत्री.
- १९१९- एम. चेन्ना रेड्डी, आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६)
- १९२६ - शक्ती सामंत, हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
- १९३८ - पं. शिवकुमार शर्मा, संतूरवादक व संगीतकार
- १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.
- १९४९ - राकेश शर्मा, एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
- १९७७ - ऑरलॅन्डो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
- १९८३ - इम्रान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
संपादन- ७०३ - जिटो, जपानी सम्राज्ञी.
- ८५८ - वेसेक्सचा एथेलवुल्फ.
- ८८८ - जाड्या चार्ल्स, पवित्र रोमन सम्राट.
- ११७७ - हेन्री दुसरा, ऑस्ट्रियाचा राजा.
- १३३० - फ्रेडरिक पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १६९१ - जॉर्ज फॉक्स, क्वेकर्स या ख्रिश्चन पंथाचा स्थापक.
- १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.
- १८३२ - थॉमस लॉर्ड, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचे संस्थापक.
- १९२६ - मनोरमा रानडे, मराठी कवयत्री.
- १९२९ - वायट अर्प, अमेरिकन शेरिफ
- १९७६ - अहमद जॉं थिरकवा, तबला वादक
- १९७८ - ह्युबर्ट एच. हम्फ्री, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९८५ - मदन पुरी, हिंदी व पंजाबी चित्रपटअभिनेता
- १९८८ - च्यांग चिंग-कुओ, तैवानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ - शंभू सेन, भारतीय संगीत व नृत्य दिग्दर्शक
- १९९७ - मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे, मराठी उद्योजक व वेदाभ्यासक.
- २००१ - श्रीधर गणेश दाढे, संस्कृतपंडित व लेखक.
- २०११ - प्रभाकर पणशीकर, मराठी अभिनेता.
- २०१३ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- केप वेर्देचा लोकशाही दिन
- स्वातंत्र्यदिन : टोगो
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - (जानेवारी महिना)