आदेश बांदेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेते, सूत्रसंचालक व राजकारणी आहेत. यांचा होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हे शिवसेनेचे सदस्य[] व पक्षाचे सचिव आहेत. मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही यांची पत्नी आहे.

आदेश बांदेकर
जन्म आदेश चंद्रकांत बांदेकर जन्म_दिनांक =
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे महाराष्ट्राचे लाडके भावोजी
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम होम मिनिस्टर, अवघाचि संसार
पुरस्कार झी मराठी अँवार्ड चा सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
वडील चंद्रकांत बांदेकर
पत्नी सुचित्रा बांदेकर

दूरचित्रवाणी कार्यक्रम

  1. अवघाचि संसार

सूत्रसंचालन

  1. होम मिनिस्टर
  2. हप्ता बंद
  3. झिंग झिंग झिंगाट
  4. एकापेक्षा एक

कारकीर्द

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या स्थापनेबरोबरच आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

राज्यमंत्रिपद

शिवसेनेचे सचिव आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. (१८ जून २०१८ची बातमी).

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ चिविलकर अमित. "आदेश बांदेकर शिवसेनेत!". २२ जुलै २०१२ रोजी पाहिले.